Palghar Nargrik

Breaking news

मोठी बातमी : अनंत गिते यांच्या ठिणगीनंतर शिवसैनिक अस्वस्थ, रायगडमध्ये गुप्त बैठक….

माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते (Anant Geete) यांनी राष्‍ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि शरद पावार (Sharad Pawar) यांच्‍या संदर्भात केलेल्‍या केलेल्‍या वक्‍तव्‍याचे पडसाद आता रायगडात उमटू लागले आहेत. शिवसैनिकांची मतं जाणून घेण्‍यासाठी उद्योग मंत्री सुभाष देसाई (Subhash Desai) यांच्‍या नेतृत्‍वाखाली जिल्‍हयातील शिवसेना आमदार, पदाधिकारी आणि प्रमुख कार्यकर्त्‍यांची गुप्‍त बैठक आज पार पडली.

या बैठकीला उपस्थित बहुतेक पदाधिकाऱ्यांनी राष्‍ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare) आणि पालकमंत्री आदिती तटकरे (Aditi Tatkare) यांच्‍या विरोधात सूर आळवला. आघाडीतील प्रमुख घटक पक्ष असूनदेखील शिवसेनेला (shivsena) जिल्‍हयात योग्‍य सन्‍मान मिळत नाही. तटकरे हे शिवसेनेचे खच्‍चीकरण करत आहेत. जिल्‍हा नियोजन समितीमधील निधी वाटपातही सवतासुभा होत असल्‍याची तक्रार यावेळी देसाई यांच्‍याकडे करण्‍यात आली.

शिवसेनेकडून आघाडी धर्माची अपेक्ष ठेवली जाते. मात्र, राष्‍ट्रवादीकडून आघाडीचा धर्म पाळला जात नाही. प्रत्‍येक ठिकाणी सेनेला दडपण्‍याचा प्रयत्‍न होत आहे. त्‍यामुळे आगामी काळात येणाऱ्या निवडणूका स्‍वबळावर लढण्‍याचा आग्रह या बैठकीत धरण्‍यात आला. या बैठकीला सुनील तटकरे यांचे बंधू माजी आमदार अनिल तटकरे, यांच्‍यासह आमदार महेंद्र दळवी, आमदार महेंद्र थोरवे, आमदार भरत गोगावले, जिल्‍हाप्रमुख अनिल नवगणे, मनोहर भोईर उपस्थित होते. या बैठकीनंतर माध्‍यमांशी बोलण्‍यास सुभाष देसाई यांच्‍यासह पदाधिकाऱ्यांनी नकार दिला. ही बैठक आगामी निवडणूकांवर चर्चा करण्‍यासाठी होती अशी सारवासारव करण्‍यात आली.

काय बोलले होते अनंत गिते?
शिवसेना (Shiv Sena) आणि काँग्रेस ( Congress) कधीच एक होऊ शकत नाहीत, असx सांगत शिवसेनेचे माजी खासदार अनंत गीते (Anant Geete) यांनी नेतृत्वाला घरचा आहेर दिला होता. राष्ट्रवादीचा (NCP) जन्म काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून झाला आहे. शरद पवार (Sharad Pawar) आमचे नेते होऊ शकत नाहीत, महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) ही केवळ तडजोड आहे, असं अनंत गीते म्हणाले होते.

Leave a Comment