Palghar Nargrik

Breaking news

डोंबिवलीची घटना धक्कादायक, राज्यात भयाचं वातावरण, देवेंद्र फडणवीस यांची टीका…..

डोंबिवलीची घटना ही अतिशय धक्कादायक आहे, अशा प्रकारची घटना उघडीस आल्यानंतर राज्यात भयाचं वातावरण आहे. सातत्याने वाढत्या घटना या चिंताजनक आहेत, असं वक्तव्य विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. सरकारने, गृहमंत्रालयाने आणि पोलिसांनी यामध्ये विशेष लक्ष घालण्याची गरज आहे. डोंबिवलीसारखा भाग जो साधारणपणे शांत भाग समजला जातो, अशा ठिकाणी बलात्कारासारखी घटना घडणं हे अतिशय धक्कादायक आहे. त्यामुळे सरकारने तात्काळ लक्ष घालून कारवाई करावी अशी मागणी देवेंद्र पडणवीस यांनी केली आहे

डोंबिवलीत अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार
डोंबिवलीत अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली असून या अल्पवयीन मुलीवर 29 जणांनी बलात्कार केल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात 29 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दोन अल्पवयीन मुलांसह 23 जणांना ताब्यात घेतलं आहे.

Leave a Comment