Mumbai – Goa Highway Issue : मुंबई-गोवा महामार्गाच्या (Mumbai – Goa Highway) रखडलेल्या कामाचा विषय संतापाचा आणि टीकेचा झाला आहे. राष्ट्रीय महामार्ग खड्ड्यात गेल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे. गेल्या 10 वर्षांपासून या महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम रखडलेले आहे. मुंबई-गोवा महामार्गाची (Mumbai – Goa Highway) अवस्था दयनिय झाली असून खड्यात रस्ता (Mumbai Goa potholes) अशी अवस्था पाहायला मिळत आहे. या मार्गाचे काम तातडीने मार्गी लागावे म्हणून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी लक्ष घातले आहे. (Mumbai-Goa Highway: Discussion between Sharad Pawar, Nitin Gadkari, Tatkare at pune; meeting in Delhi on 5th October)
मुंबई-गोवा महामार्गाच्या कामासंदर्भात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुनील तटकरे यांच्यात चर्चा झाली. ही चर्चा पुणे विमानतळावर झाली. यावेळी रखडलेल्या कामासंदर्भात 5 तारखेला दिल्लीत बैठक होणार आहे. याबाबतची माहिती खासदार सुनील तटकरे यांनी दिली. या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे.
रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाच्या कामासंदर्भात आता थेट शरद पवारांनी लक्ष घातले आहे. त्यामुळे या मार्गाचे पूर्णत्वाला जाईल, अशी अपेक्षा आहे. पवार, गडकरी आणि तटकरे यांच्यात झालेल्या चर्चेवेळी कामे प्रलंबित राहण्याची कारणे आणि इतर मुद्द्यांवर चर्चा झाली. येत्या पाच तारखेला दिल्लीत महत्वाची बैठक होणार असून प्रलंबित मार्गाचा प्रश्न मार्गी लावला जाणार आहे. त्यामुळे गेली आठ-नऊ वर्षे रडत-खडत सुरु असलेल्या कामाला गती मिळणार आहे, अशी माहिती खासदार सुनील तटकरे यांनी दिली.