Palghar Nargrik

Breaking news

मराठा समन्वय महासंघाच्या राज्य उपाध्यक्ष पदी संतोष मराठे तर प्रदेश प्रवक्ते पदी बाबासाहेब गुंजाळ यांची नियुक्ती…..

मराठा समन्वय महासंघाच्या वतीने त्यांच्या राज्य कार्यकारिणीची विस्तार नुकताच अध्यक्ष अनिल दादा पाटील व सरचिटणीस बळवंतराव पवार यांच्या उपस्थित बोईसर येथे नुकतीच एक बैठक पार पडली. पालघर जिल्ह्यातील मराठा समाजासाठी काम करणाऱ्या व्यक्तींना मराठा समन्वय महासंघाच्या प्रदेश तसेच जिल्हा कार्यकारणी वरती घेण्याचा ठराव एकमताने पास करण्यात आला. यावेळी बोईसर येथील सामाजिक कार्यकर्ते मराठा समाज महासंघाचे कार्यकर्ते या बैठकीला उपस्थित होते. येणाऱ्या कालावधीत मराठा समन्वय महासंघ यांच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पदी संतोष पांडुरंग मराठे यांना नियुक्त करण्यात आले प्रदेश प्रवक्ते म्हणून बाबासाहेब शिवाजी गुंजाळ यांची नियुक्ती झाली आहे. पालघर जिल्हा उपाध्यक्ष म्हणून संतोष जनार्दन चव्हाण यांची नियुक्ती झाली आहे. महिला जिल्हाध्यक्ष म्हणून श्रीमति दीप्ति महाडिक यांची नियुक्ती करण्यात आली आहे.


मराठा समन्वय महासंघ महाराष्ट्रभरात मराठा समाजाच्या समस्यांसाठी काम करत असताना शासकीय सेवेतील अधिकारी व कर्मचारी यांच्याशी सामाजिक कार्यकर्ते यांच्यात समन्वय साधत समाजाच्या समस्या सोडवण्यात अग्रेसर आहे. वेगवेगळ्या 28 जिल्ह्यांमध्ये काम करणाऱ्या लोकांना नियुक्ती देण्याचे सत्र सध्या मराठा समन्वय महासंघाने हाती घेतले आहे. मराठा समाजाला 50% आत मधलं टिकाऊ आरक्षण देण्याची विशेष मोहीम सध्या महाराष्ट्रात मराठा समन्वय महासंघाकडून राबवण्यात येत आहे. वेळ पडली तर उच्च न्यायालय, सर्वोच्च राहिलात लढा देण्याची तयारी सुद्धा मराठा समन्वय महासंघ यांनी सुरू केल्याची माहिती महासंघाचे अध्यक्ष अनिल पाटील यांनी दिली आहे.

Leave a Comment