मुंबईतून धक्कादायक बातमी समोर आली आहे. पोलिसांनी देहविक्रीचा व्यवसाय चालवणाऱ्याएका महिलेला अटक केली आहे. मुंबईच्या क्राईम ब्रांचने टुरिझमच्या माध्यमातून शरीरविक्रीचा व्यवसाय करणाऱ्या महिलेला अटक केली आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणातील आरोपी महिला सेक्स टुरिझमच्या माध्यमातून देहविक्रीचा व्यवसाय चालवायची. ग्राहकाला मुलींचे फोटो पाठवले जायचे. त्यानंतर ग्राहकाकडून भारतातील कोणत्याही एका पर्यटनस्थळाच्या तिकीटाचं बुकींग घेतलं जायचं.
या संपूर्ण व्यवहारासाठी 50 ते 60 हजार रूपये घेतले जात होते. क्राईम ब्राचनं एक बनावट ग्राहक पाठवून आरोपी महिलेसोबत डील केलं. त्यानंतर ती महिला दोन मुलींसोबत मुंबई विमानतळावर आली असता पोलिसांनी तिला आणि तिच्या साथीदाराला अटक केली आहे.