Palghar Nargrik

Breaking news

25 हजार कोटींचा आरोप खोटा, कारखान्यांबाबत चुकीची माहिती – अजित पवार….

Ajit Pawar On 25,000 Crore Corruption Allegations :25 हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप खोटा आहे. चुकीची माहिती दिली आहे. कारखान्यांबाबतही खोटी माहिती दिली गेली आहे, असा आरोप उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केला आहे. (25,000 crore corruption allegations false, misinformation about sugar factories – Ajit Pawar)

भाजपचे किरीट सोमय्या यांनी अजित पवार यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केला होता. तसेच कारखान्यांबाबतही त्यांनी आरोप केला होता. याला आता अजित पवार यांनी करण्यात आलेले आरोप फेटाळून लावले आहे. जो 25 हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. (Ajit Pawar On 25,000 Crore Corruption Allegations) ती माहिती पूर्णत: चुकीची आहे, असे अजित पवार म्हणाले.

अजित पवार यांनी आपण आयकर विभागाच्या कारवाईनंतर बोलणार असे स्पष्ट केले होते. त्यानुसार त्यांनी यावर भाष्य केले आहे. जरंडेश्वर केस ईडीकडे आहे, न्यायालयात आहे. भाजपचे सरकार असताना एसीबी, सीआयडी, EoW चौकशी झाली आहे. राज्यात केवळ जरंडेश्वर एकटा कारखाना नाही. काही काही कारखाने 3 कोटी, 4 कोटी अशा पद्धतीने विकले गेले आहेत. हे कारखाने कर्ज थकले म्हणून सहकार विभागाने हायकोर्टाच्या कमिटीच्या नियंत्रणाखाली विकले गेले. पण जाणीवपूर्वक त्याच गोष्टी वारंवार दाखवल्या जातात. माझ्या बद्दल काही लोकांना बेईमानी केली म्हणून गरळही ओकली. मी बेईमान आहे की कामाचा हे महाराष्ट्राला माहित आहे. मी बेईमानी कधी केली नाही, ते आमच्या रक्तात नाही, असे अजित पवार म्हणाले.

काही कारखाने काही बिल्डरांनी घेतले, काही राजकीय पक्षाच्या संबंधित लोकांनी घेतले आहेत. त्याबाबत बोललं जात नाही, पण माझ्या नातेवाईकांबाबत बोललं जात आहे. तसेच मागील काळात छगन भुजबळ यांचीही अशी बदनामी केली गेली. त्यांचा दोन वर्षांचा काळ वाया गेले. नंतर ते निर्दोष सुटले, असा दाखला अजित पवार यांनी दिला.

पुण्यात दिवाळी पहाट कार्यक्रमांना परवानगी देण्यात आली आहे. तर दिवाळीनंतर आढावा घेऊन थिएटर्स शंभर टक्के क्षमतेनं सुरू करणार आहोत, अशी माहिती अजित पवार यांनी दिली. त्याचवेळी मुंबईतही परिस्थिती पाहून निर्णय घेतला जाईल, असे ते म्हणाले. दिवाळीनंतर परिस्थिती व्यवस्थित असेल तर थिएटर्स शंभर टक्के क्षमतेनं सुरू करायला परवानगी देऊ, असे त्यांनी स्पष्ट केले.

Leave a Comment