राज्याचे ग्रामविकास मंत्री, राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) हे नगरचे पालकमंत्रिपद सोडणार आहेत. कोल्हापूरकडे जास्त लक्ष देता यावे, यासाठी त्यांनी पक्षाच्या वरिष्ठांकडे आपल्याला नगरच्या जबाबदारीतून मुक्त करण्याची मागणी केली आहे. नगर जिल्ह्यातील अकोले येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी स्वत:च याला दुजोरा दिला असून स्वजिल्हा असल्याने आपल्याला अहमदनगरपेक्षा कोल्हापूर महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.
े
महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर नगरचे पालकमंत्रिपद राष्ट्रवादीच्या वाट्याला आले. पक्षाने या जागी मुश्रीफ यांची नियुक्ती केली. तर कोल्हापूरचे पालकमंत्रिपद काँग्रेसला गेल्याने तेथे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, थोरात तेथे जाण्यास इच्छुक नव्हते. प्रदेशाध्यक्ष असल्याने कोणत्याच जिल्ह्याचे पालकमंत्रिपद नको, अशी भूमिका घेत त्यांनी पद सोडले. त्याचवेळी मुश्रीफ हेही कोल्हापूरसाठीच आग्रही असल्याने त्यांनीही अनिच्छेनेच नगरचे पद स्वीकारले. मधल्या काळात अधूनमधूनच ते नगरला यायचे. त्यावरून भाजपकडून त्यांच्यावर टीकाही केली जात असे. अलीकडेच भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी मुश्रीफ यांच्यावर आरोप केले. त्यामुळे ते कोल्हापूरमध्ये अधिकच अडकून पडले. नगरचा पूरग्रस्त भागाचा पाहणी दौराही त्यांनी रद्द केला होता. यावरून पुन्हा त्यांच्यावर टीका सुरू झाली आहे.
आता तर त्यांनी नगरचे पालकमंत्रिपदच नको, अशी भूमिका पक्षाच्या बैठकीत घेतली आहे. आजपासून मुश्रीफ दोन दिवसांच्या नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत. आज अकोले येथे पत्रकारांनी त्यांना या विषयावर विचारले असता त्यांनी पद सोडण्याचा विचार असल्याचे मान्य केले. ते म्हणाले, ‘नगरचे पालकमंत्रिपद सोडण्यासंबंधी आपण बैठकीत मागणी केली आहे. नजीकच्या काळात नगर आणि कोल्हापूर जिल्ह्यात एकाच वेळी विविध निवडणुका येत आहेत. दोन्ही जिल्ह्यांत अंतर खूप आहे. त्यामुळे दोन्हीकडे मला न्याय देता येणार नाही. स्वजिल्हा म्हणून मला कोल्हापूरमध्ये जास्त लक्ष घालणे आवश्यक आहे. त्यामुळे नगरच्या पालकमंत्रिपदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्याची मागणी केली आहे.’
आघाडी सरकार भक्कम आहे, ते कार्यकाळ पूर्ण करेल, असे सांगून ते म्हणाले, पुढील काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाविकास आघाडी एकत्र लढेल. अर्थात काही ठिकाणी त्याला अपवादही असेल. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी महाविकास आघाडी सोडणार असल्याच्या संदर्भात विचारले असता त्यांनी थेट उत्तर देणे टाळले.
address:-
Saad Designer 9226937484
Add : Royal Point B 10 , Kacheri Road , Palghar West
Near Registration Office