अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानसह (Aryan Khan) अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा या तिघांना मुंबई उच्च न्यायालयानं जामीन दिला आहे. आर्यनला जामीन मिळताच “पिक्चर अभी बाकी है, मेरे दोस्त”, असे म्हणत ट्वीट करत नवाब मलिकांनी (Nawab Malik) सूचक इशारा दिला आहे. नवाब मलिक यांच्या ट्विटनं चर्चांना उधाण आले आहे.
दरम्यान या केसमध्ये आधीच जामीन मिळायला हवा होता, असं नवाब मलिक यांनी म्हटलं होते. तसंच एनसीबीचे वकील नवनवीन युक्तीवाद करुन तुरुंगात जास्त दिवस कसं ठेवायचं या प्रयत्नात होते, असंही मलिकांनी म्हटलं होते. या सुनावणीकडे अनेकांचं लक्ष लागलं होतं. सर्वांचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने जामिनावर अंतिम निर्णय दिला. त्यामुळे आर्यन खानची दिवाळी तुरुंगात न जाता आपल्या घरी ‘मन्नतवर’ जाणार हे स्पष्ट झाले आहे.
आर्यन खानची बाजू मांडण्यासाठी ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी यांच्यासह ज्येष्ठ वकील सतीश मानेशिंदे न्यायालयात हजर आहेत. तिन्ही आरोपींच्या वकिलांनी जामिनासाठी न्यायालयासमोर युक्तिवाद केलाय. क्रूझ ड्रग्ज पार्टीप्रकरणी कोठडीत असलेला आर्यन खान 25 दिवसांनी कोठडीतून बाहेर येणार आहे.