Palghar Nargrik

Breaking news

किरण गोसावीला आठ दिवसांची पोलीस कोठडी…..

पुणे : क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणातील (Mumbai Cruise Drug Case)  एनसीबीचे (NCB)  वादग्रस्त पंच किरण  गोसावीला (Kiran Gosavi) आठ दिवसांची पोलीस कोठडी सुनवण्यात आली आहे. आर्यन खानसोबतच्या सेल्फीमुळे वादात आलेल्या किरण गोसावींवर पुण्यातील फरासखाना पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंद आहे. नोकरीचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप किरण गोसावींवर आहे.

किरण गोसावी विरुद्ध ठाणे,  कळवा,  अंधेरी,  पालघर अशा अनेक पोलीस ठाण्यात गुन्हे नोंद आहेत.   किरण गोसावीने अनेक तरुणांना फसवले आहे. यामध्ये अनेकांची मोठी फसवणूक झाली आहे.  त्याचा तपास करायचा असल्याने किरण गोसावीची 10 दिवसांची पोलीस कोठडी मिळावी अशी सरकारी वकिलांची मागणी केली होती.

Leave a Comment