मनोर ते पालघर जिल्हाधिकारी कार्यालय
पालघर आदिवासी जिल्हा असला तरी आदिवासी समाजाचे हाल जिल्ह्यामध्ये अत्यंत बिकट आणि दयनीय आहेत या समाजावर होणाऱ्या अन्यायाला न्याय मिळवून देण्यासाठी आदिवासी समाजाचे नेते आदिवासी एकता मित्र मंडळाचे अध्यक्ष श्री संतोषजी जनाठे साहेब तसेच मंडळाचे विश्वस्त दामोदर कासट,मंगेश गोंड,योगेश भुयाळ व सर्व प्रमुख कार्यकर्ते यांच्या नियोजनात आज दि 8 नोव्हेंबर 2021 रोजी लाँग मार्च व ठिय्या आंदोलन मनोर पासून ते पालघर जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आला प्रमुख 12 मागण्यांसाठी जिल्ह्यातील वन मजूर,मलेरिया कामगार व काटेलपाडा ग्रामस्थ यांचा रस्त्याचा प्रश्न या विषयावरून मोर्चाचे स्वरूप ठरले होते.शासकीय दबाव तंत्राचा वापर करत पोलिस प्रशासना मार्फत आंदोलन थांबवण्याचा अतोनात प्रयत्न केला गेला पण संतोषजींच्या मार्गदर्शना खाली असलेल्या सर्व आदिवासी पीडित महिला व समाज यांचा आक्रोश बॅरिकेट व दोर तोडत पुढे निघाला, लाँग मार्च पायी चालत मनोर पासून निघाला आणि पुढील नेटाळी या स्टॉप वर चहा पाण्यासाठी थांबा करण्यात आला
पण पोलिसांन मार्फत कळवण्यात आले की प्रलंबित प्रश्न असलेल्या त्या त्या खात्याचे शासकीय अधिकारी मागण्या ऐकण्यासाठी येत आहेत तरी तासभर सर्वाना थांबवल्या नंतर सर्व शासकीय अधिकारी उपस्थित झाले सर्व मागण्यांवर चर्चा करण्यासाठी मातीत जन्मलेल्या संतोषजी जनाठे यांनी शासनाच्या प्रतिनिधींना मातीवर बसवून चर्चा करण्यास भाग पाडले.आपला पाठिंबा देत ठाण्याचे भाजप आमदार मा.संजयजी केळकर ,भाजपा पालघर जिल्हाअध्यक्ष मा.नंदकुमारजी पाटील ,मा.बापजी काठोले,मा.हरिश्चंद्र भोये,मा.हेमांतजी सवरा,मा. सुरेखा ताई थेतले, मा.सुशील औसरकरमा.ज्योतिताई भोये, उपस्थित होते.चर्चा करून पुढील मागण्या येत्या महिन्या भराच्या आत पूर्ण करू असे फक्त आश्वासन नाही तर लेखी स्वरूपात लिहून घेण्यात आले ,आंदोलन यशस्वी करत तात्पुरता स्थगित करण्यात आले व महिन्या भरात जर हे प्रश्न मार्गी लागले नाही तर तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा आदिवासी एकता मित्र मंडळातर्फे करण्यात आला.