पालघर जिल्हा प्रतिनिधी :- प्रतिक मयेकर
PMमुंबईच्या चेंबूर भागातून अपहरण करण्यात आलेल्या चार वर्षीय बालकाची नाशिकरोड पोलिसांनी यशस्वी सुटका केली. अत्यंत सावधपणे शोध घेत पोलिसांनी ही मोहीम फत्ते केली. अपहरण करणाऱ्या संशयित आरोपीलाही पोलिसांनी ताब्यात घेतले
चेंबूरमधून सोमवारी (दि. ८) सायंकाळी एका लहान मुलाचं अपहरण केल्यानंतर संशयित आरोपी रामपाल उदयभान तिवारी (रा. बंसतपुरराजा, जि. गोंडा, उत्तर प्रदेश) हा रेल्वेने नाशिकरोडच्या दिशेने गेल्याची माहिती नाशिकरोड पोलिसांना मिळाली होती. प्रकरण गंभीर असल्याने वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी तातडीने पाऊलं उचलत नाशिकरोड हद्दीत शोधमोहीम हाती घेतली. त्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांनी स्वतंत्र पथक रवाना केले.
तपासादरम्यान देवी चौकात एक व्यक्ती लहान मुलाला घेऊन फिरत असल्याची गुप्त माहिती पोलीस कर्मचारी कैलास थोरात यांना मिळाली होती. त्यावरुन पोलिसांनी तातडीने त्या भागात धाव घेत मंगळवारी (दि. ९) सकाळी तिवारीला ताब्यात घेतलं. खंडणीसाठी या बालकाचं अपहरण करुन त्याला उत्तर प्रदेशात जाणार असल्याची कबुली तिवारीने दिली. संशयितासह बालकाला नाशिकरोड पोलिसांनी पुढील कार्यवाहीसाठी मुंबई पोलिसांच्या ताब्यात दिलं.