पालघर जिल्हा प्रतिनिधी :- प्रतिक मयेकर
डहाणू :- डहाणू तालुक्यातील कासा येथील एका विवाहित तरुणाने घराच्या बाजूला असलेल्या पोहा मील मधील लोखंडी आडवे पाईपला नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली.
सदर घटनेची माहिती मिळताच कासा पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी त्वरित येऊन पंचनामा करून रजि. न.५९/२०२१ सी.आर.पी.सी.१७४ प्रमाणे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मयत इसम मंगेश. आठवले यांचा विवाह झाल्यापासून पत्नीबरोबर वारंवार भांडण होत होते. नेहमी होणाऱ्या भांडणामुळे मृत इसम मंगेश याने वैतागून रागाच्या भरात गळफास घेऊन जीवन संपवले असल्याची माहिती मंगेश ची आईने पोलिसांना दिली असून पुढील अधिक तपास कासा पोलीस करीत आहे.