Palghar Nargrik

Breaking news

पालघर पोलिसांच्या आशीर्वादाने आरोपी मोकाट…..

प्रतिनिधी :- प्रतिक मयेकर

जर कोणी गुन्हे केले असेल तर ज्यांना जामीन मिळत नसेल तर पालघर पोलिसांकडे या याचे उत्तम उदाहरण आम्ही तुम्हाला देऊ शकतो? गेल्याच महिन्यात पालघर नागरिक चे संपादक जावेद लुलानिया यांच्यावर झालेल्या गोळीबारात दोन आरोपी यांना अटक केली होती. पण आता त्यांची जामीन केली असून पुन्हा जावेद लुलानिया यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे हे आरोपी पालघर मध्ये पालघर पोलीस यांच्या आशीर्वादाने मोकाट फिरताना दिसत आहे. जर पुन्हा जावेद लुलानिया यांच्यावर हल्ला करण्यात आला तर याची पूर्ण जबाबदारी पालघर पोलीस घेईल. कारण जावेद लुलानिया यांनी दिलेल्या माहितीनुसार पालघर पोलिसांना स्टेटमेंट देणार नाही तर मी वर्सोवा पोलिसांना स्टेटमेंट देणार होतो. तसेच मुंबई या ठिकाणी सुद्धा मुंबई पोलीस स्टेटमेंट घेण्यासाठी आली होती. परंतु त्यांना सुद्धा हेच सांगण्यात आले.की मी वर्सोवा पोलिसांना स्टेटमेंट देईल यावरूनच जावेद लुलानिया यांचा पालघर पोलिसांवर अजिबात विश्वास नाही का? जावेद लुलानिया यांनी पालघर पोलिसांना नकार का दिला ? पालघर पोलीस कुठेतरी कमी पडत आहेत. हे जावेद लुलानिया यांच्या स्टेटमेंट वरून कळत आहे. याचे उत्तर पालघर पोलीस देऊ शकतात का? तसेच पालघर चे पोलीस अधीक्षक दत्तात्रेय शिंदे हे सुद्धा कुठे तरी कमी पडत आहेत हे दिसून येत आहे. व या केस मध्ये पोलीस अधीक्षक बारकाईने लक्ष्य देताना दिसत नाही आहे. या गोड आरोपी मागे पालघर चे पोलीस अधीक्षक यांचे आशीर्वाद नाही ना? असा सवाल जनता करत आहे. जर पोलीस अधीक्षक चा आशीर्वाद असेल तर पालघर नागरिक चे टीम पालघर पोलिसांचा जाहीर निषेध करते.

पालघर पोलीस या प्रकरणात झोपेचे सोंग घेत असल्याचा दिसून येत आहे.असून,आसिफ धनानी व जुबेर धनानी पोलिसांच्या हद्दीतच हे आरोपी फिरत असल्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.एका पीडित महिलेच्या बलात्कार प्रकरणात पत्रकार जावेद लुलानिया हे पीडित महिलालं आपल्या वृत्तपत्राच्या च्या साह्याने तिला न्याय देण्यासाठी यांनी धनानी विरोधात बातमी लावल्यामुळे आसिफ धनानी, जुबेर धनानी, व इक्बाल धनानी यांनी जावेद लुलानिया वर दोष ठेवून बसले होते. याची कल्पना पहिल्यापासून जावेद लुलानिया यांना होती. तसेच आपल्या जीवाला धोका आहे हे सुद्धा माहित होत.याची कल्पना गेल्या सहा महिन्यापासून तीन अर्ज पालघर पोलिसांना देण्यात आले होते. परंतु याकडे पालघर पोलिसांनी दुर्लक्ष केले. यामध्ये पालघर पोलिसांना धनानी कुटुंबीयांकडून काही धन प्राप्त झाले आहे का! अशी चर्चा नागरिकांमध्ये होत आहे. कारण पालघर पोलीस एवढी बे जबाबदार झाली आहे का? अर्ज देऊन सुद्धा पोलीस काही कारवाई करत नसल्याने दिसून येत आहे. जर पोलिसांनी त्यावेळी कारवाई केली असती तर जावेद लुलानिया यांना गोळी लागली नसती याची पूर्ण जबाबदारी पालघर पोलीस घेईल का?

तसेच जावेद लुलानिया यांना आज हॉस्पिटल मधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. व त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्यामुळे आरोपींवर पालघर पोलिसांचा मोठाच आशीर्वाद आहे.

Leave a Comment