पालघर :- काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात अपमानजनक वक्तव्य केल्याने राज्यात भाजप आक्रमक झाली आहे. पालघर मध्ये भाजपतर्फे नाना पटोलेंचा निषेध व्यक्त करण्यात आला. पटोलेंच्या प्रतिमेला जोडा मारो आंदोलन करण्यात आलं. तसेच त्यांचे प्रतिमेलं जाळण्याचा प्रयत्न केला. नाना पटोले हाय हाय च्या घोषणांनी परिसर दणाणला होता. भाजप कार्यालयापासून हुतात्मा चौकापर्यंत मोर्चा काढून आंदोलन करण्यात आलं.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना अटक करावी या मागणीसाठी आंदोलन करणारे भाजपचे कार्यकर्ते यांनाच पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये चांगलाच असंतोष उफाळून आला आहे. घुमजाव करणाऱ्या पटोले यांनी मोदी नावाचा गावगुंड कोण याची माहिती द्यावी अशी मागणी पाटील यांनी केली आहे.
नाना पटोले मोदींबाबत नेमक काय म्हणाले?
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले लाखनी तालुक्यात म्हणाले की ‘मी मोदीला मारु शकतो आणि शिव्याही देऊ शकतो’ असं ते म्हणाले होते.तसेच एका प्रचारसभेदरम्यान पटोले यांनी ‘मी मोदीला मारू शकतो व शिव्याही देऊ शकतो’ असे वक्तव्य केले होते. त्याचा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल झाला आहे. यानंतर, भाजपचे कार्यकर्ता आक्रमक भूमिका घेतली आहे. आपल्या वक्तव्याने वाद वाढल्यानंतर नाना पटोले यांनी यावर स्पष्टीकरण देताना मी गावगुंड असलेल्या मोदीबद्दल बोललो होतो, असे म्हटले आहे. काही नागरिक आमच्या परिसरातील मोदी नावाच्या गावगुंडाची तक्रार घेऊन आले होते. त्यांना तुम्ही घाबरु नका. मी तुमच्या सोबत आाहे. मोदीला मी मारु शकतो, शिव्या देऊ शकतो असे म्हटले. मी कुठेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाचा उल्लेख केला नाही. माझ्या बोलण्याचा विपर्यास केला जात आहे असे काँग्रेसचे पटोले म्हणाले.
तसेच या तीव्र आंदोलन मध्ये नंदकुमार पाटील – जिल्हा अध्यक्ष,प्रशांत पाटील – जिल्हा उपाध्यक्ष,समीर पाटील – जिल्हा युवा अध्यक्ष,सुजित पाटील – जिल्हा सरचिटणीस,सुशील औसरकर – जिल्हा सरचिटणीस ,शिरीष संखे – पालघर शहर जनरल सेक्रेटरी व भाजपाचे कार्यकर्ते सुद्धा प्रचंड प्रमाणात आज उपस्थित होते.