पालघर- सलीम कुरेशी
मौजे नवली पालघर ता.जि.पालघर येथील भुमापण क्रमांक व उपविभाग- 48/1/1/1/1/अ1 एकुण क्षेत्र 23.13. 87 पैकी 0.70.0 हे. आर. महाराष्ट्र सरकार गुरचरण जमिनीवर झालेले बेकायदेशीर कारखान्याचे बांधकाम निष्कासित करण्याकरीता उपविभागीय अधिकार्यांनी 2016 ला अतिक्रमण निष्कासित करण्याबाबत आदेश देऊनही तहसिलदार पालघर व मुख्याधिकारी नगरपरिषद पालघर हे अधिकारी संबंधित अतिक्रमणावर कारवाई करत नसल्याने दिनांक-10 फेब्रुवारी पासुन तहसिलदार कार्यालय पालघर समोर महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटनेचे सर्व पदाधिकारी बेमुदत धरणे, आंदोलन-उपोषण करणार आहेत
सार्वजनिक वापरातील जमिनी/गायरान जमिनी इतर प्रयोजनासाठी वापरण्यावर निर्बंध घालण्याबाबत व अतिक्रमणे निष्कासित करण्याबाबत महसूल व वन विभाग शासन निर्णय क्र.जमिन 03/2011/प्र.क्र.53/ज-1 मंत्रालय मुंबई 400032 दिनांक-12 जुलै 2011 या आदेशाची हे अधिकारी पायमल्ली करत आहेत. तसेच मा.सर्वोच्च न्यायालय 28/01/2011 च्या आदेशाचा अवमान करत असल्यामुळे या दोन्ही अधिकार्यांच्या बेजबाबदारपणा व निष्क्रियते विरोधात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटनेच्या वतीने बेमुदत धरणे,आंदोलन-उपोषण करण्यात येत आहे.
या आंदोलनात नागरिकांनी आपला सहभाग नोंदवून संघटनेला सहकार्य करावे. असे आवाहन संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.