पालघर – महाराष्ट्राला लाभलेल्या ७२० कि. मी. लांबीच्या समुद्र किनारपट्टीवरील ४० हून अधिक समुद्र किनारे स्वच्छ करण्यासाठीचा संकल्प राजपुत्र सन्मा. अमितसाहेब ठाकरे यांनी घेतला आहे. सदर संकल्प मोहिमेचा शुभारंभ दि. ११ डिसें २०२१ रोजी एकाच वेळी संबंध महाराष्ट्रात करण्यात आला होता. त्याच निरंतर प्रक्रियेतून आज पालघरचे शहराध्यक्ष सुनील राऊत यांच्या नेतृत्वात शिरगांव येथील समुद्र किनारा स्वच्छ करण्यात आला.
स्वच्छ समुद्र किनारे या अमित ठाकरे यांच्या संकल्पनेतून आणि पालघर – ठाणे जिल्हाध्यक्ष मा. अविनाश जाधव, पर्यावरण सेनेचे अध्यक्ष मा. जय श्रृंगारपुरे यांच्या सूचनेनुसार शिरगांव बीच स्वच्छता अभियान रविवार दिनांक १३ फेब्रु २०२२ रोजी शिरगांव समुद्र किनारा स्वच्छता मोहीम राबाविण्यात आली.
तसेच जिल्हा सचिव सुनील राऊत म्हणत होते की स्वच्छता राखणं आणि इतरांना राखायला लावणं हे चांगलं कार्य आहे, कारण एका अर्थानं तो मानवधर्मच आहे.
या वेळी मनसे पालघर शहराकडून कोरोना निर्बंधाचे तंतोतंत पालन करण्यात आले होते. परिसर स्वच्छता एकदाच करून भागणारी गोष्ट नाही, तर ही सतत चालणारी प्रक्रिया असून, यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना सतत प्रयत्नशील असणार आहे असे सांगून, उपस्थित सर्वांचे पालघर शहर अध्यक्ष सुनिल राऊत
यांनी आभार प्रदर्शन केले.
या स्तुत्य उपक्रमात मनसेचे जिल्हा सचिव दिनेश गवई, पालघर शहर अध्यक्ष सुनिल राऊत, विभाग अध्यक्ष शिवा यादव, शिरगांव शाखा अध्यक्ष मयूर राऊत, मनविसे काशिपाडा शाखा अध्यक्ष समीर मोरे, मनसेचे अनिल चव्हाण, देवन अंबरोसे आणि दांडेकर कॉलेजचे प्रा. भूषण भोईर सर, शिरगांव गावचे ग्रामस्थ हरिश्चंद्र पाटील, कमळाकर राऊत, नितीन मोगरे, नरेंद्र चुरी, राजेश पाटील, जयेश पाटील, जितेश राऊत, विशाल मोरे, आनंद मोरे, पराग राऊत, प्रशांत राऊत इत्यादी ग्रामस्थ आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी सक्रीय सहभाग नोंदविला.