दुसऱ्याची गरज आणि दुःख जाणून पुढे केलेला मदतीचा हात हेच खरे आर्ट ऑफ लिव्हिंगचे मर्म आहे. याच उद्देशाने आज पालघर मनसे कडून ब्लँकेट्स वाटप करण्यात आले.
मनात श्रद्धा, डोळ्यात स्वप्नं आणि निरपेक्ष समाजसेवेच्या उर्मीतून धनसार भोईरपाडा येथील गरजू लोकांना शिवजयंती निमित्त २० फेब्रुवारी २०२२ रोजी ब्लँकेट्स वाटप करून मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी माणुसकीचे दर्शन घडविले आहे. माणसांच्या वेशातले असे देवदूत लॉकडाउनच्या काळात देखील सेवा करताना दिसत आहेत हे खूप कौतुकास्पद असून, यामुळे जनसेवेचे कंकण बांधलेल्या मनसे पदाधिकाऱ्यांचे उपस्थित ग्रामस्थानी धन्यवाद व्यक्त केले.
यावेळी मनसेचे पालघर जिल्हा सचिव दिनेश गवई, पालघर शहर अध्यक्ष सुनिल राऊत, शहर सचिव शैलेश हरमलकर, मनकासे उपचिटणीस सुनिल पाटील, विभाग अध्यक्ष शिवा यादव, मनसैनिक अमोल वारे, सचिन मेंढे, विनायक ढेकळे, मनोज पाटील, अनिल चव्हाण आदी मनसैनिक उपस्थित होते.