पालघर सलीम कुरेशी
पालघर : पालघर जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती सुशील चुरी यांचा अनधिकृत बंगला पाडून शासकीय जमीन जप्त करण्यात यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.माणिक गुरसाळ यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिले आहेत.
पालघर तालुक्यातील कुडण ग्रामपंचायतीच्या शासकीय जमिनीचा गैरवापर करून सुशील चुरी यांनी अनधिकृत बंगला बांधल्याची तक्रार आल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी हे आदेश काढले. ही जमीन ग्रामपंचायत कुडाणच्या नावावर आहे.
शासकीय जमिनीवरील अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण हटविण्याबाबत 10 ऑगस्ट 2013 च्या आदेशानुसार सुशील चुरी यांच्यावर तात्काळ कायदेशीर कारवाई करून बंगले पाडून जागा कायमस्वरूपी ताब्यात घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत.