प्रतिनिधी:- सलीम कुरेशी
जव्हार:- जव्हार या ठिकाणी एक इसम अमली पदार्थाची विक्री करत आहे.तशी बातमी श्री.अजय वसावे,प्रभारी अधिकारी स्थागुशा पालघर यांना गोपनीय सूत्राकडून शिवनेरी नगर देशी दारूच्या दुकानाच्या पाठीमागे विक्री करत असताना त्याला पालघर एलसीबी यांना पकडण्यात यश आला आहे.
तसेच जव्हार या ठिकाणी जुगार, गुटका चे धंदे एक नामांकित व्यक्ती चालवत आहे. माननीय एलसीब वसावे यांनी यांच्यावर सुद्धा कारवाई करण्यात यावी अशी आम्ही विनंती करतो.
या इसम याचे ताब्यातून ६७७४/- रू किमतींचा ७९७ ग्रॅम वजनाचा उग्र वास येत असलेला हिरवट व काळपट रंगाचे पानाचा चुरा वसफेद रंगाचा बिया असलेला गांजा सदृश्य अमली पदार्थ ( प्रति किलो ८५००/-रुपये प्रमाणे) कि. सु, त्याचप्रमाणे १७३००/-रुपये रोख रक्कम असा ऐकून २४,०७४/-रुपये किमतीचा अमली पदार्थ चा माल बेकायदेशीरपणे विक्री करीता बाळगताना मिळून आल्याने जप्त करण्यात आला आहे. आरोपीविरुद्ध जव्हार पोलीस ठाणे गुन्हा रजि. क्र.π ३२/२०२२ गुंगीकारक औषधी द्रव्य व मनो व्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ चे कलम ८ (क),२० प्रमाणे, गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पालघर पोलीस करीत आहेत.
सदरची कामगिरी श्री. प्रकाश गायकवाड, अप्पर पोलीस अधीक्षक, पालघर तथा प्रभारी पोलीस अधीक्षक, पालघर यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. अजय वसावे, प्रभारी अधिकारी स्थागुशा पालघर, श्री. अप्पासाहेब लेंगरे, प्रभारी अधिकारी जव्हार पोलीस ठाणे, पोलीस उपनिरीक्षक/सागर पाटील, जव्हार पोलीस ठाणे यांनी व स्थानिक गुन्हे शाखा नेमणुकीतील पोलीस अमलदार यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.