प्रतिनिधी:- पालघर नगरी प्रतिक मयेकर
सफाळे:- पालघर जिल्हा मध्ये अनेक ठिकाणी रेती माफियांवर पोलीस कारवाई करताना दिसत आहे. तसेच सफाळे पोलिसांकडून रेती चोरट्यांवर कारवाई करण्यात आली आहे.
सफाळे पोलीस स्टेशनचे सहा. पोलीस निरीक्षक श्री. संदीप कहाळे, यांनी सफाळे पोलीस स्टेशनचा कारभार स्वीकारल्यापासून उत्तम कामगिरी करताना दिसत आहेत. तसेच दि.२२/०२/२०२२ रोजी १५.४० वाजताच्या सुमारास ऑल आउट ऑपरेशन दरम्यान फरारी आरोपी याचा शोध घेत असताना गिराळे गावालगत वैतरणा नदीकिनारी येथे तीन आरोपी हे आपसात संगणमत करून शासनाची परवानगी नसताना गिराळे गावाच्या हद्दीत वैतरणा नदी किनारी अवैध्य रेती उत्खनन करून रेतीची चोरटी वाहतूक करण्याच्या उद्देशाने एकूण २५,८०,०००/- रुपये किमतीच्या १ लोखंडी बोट त्यामध्ये ०८ ब्रास रेती, ०१ सेक्शन पंप सह पर्यावरणाचा हास करत रेती उत्खनन करून चोरी करत असताना सफाळे पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक संदीप कहाळे यांनी उत्तम कामगिरी केली व त्यांच्यासोबत कर्मचारी यांनी केली .
तसेच आरोपी यांच्या ताब्यातून १५,००,०००/- रुपये किमतीचा लोखंडी रेतीचा बोट जुवाकिअं त्याच प्रमाणे ८०,०००/- रुपये किमतीचा लोखंडी बोटी मधील ०८ ब्रास रेती व १०,००,०००/- रुपये किमतीचा लोखंडी सेक्शन पंप जुवाकिअं असा एकूण २५,८०,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून सफाळे पोलीस ठाणे गु.रजि. क्र π १५/२०२२ भादंविस कलम ३७९,३४ सह महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ मधील कलम ४८ (७),४८ (८) पर्यावरण ( संरक्षण) अधिनियम १९८६ चे कलम १५,१९ प्रमाणे गुन्हा दाखल केला असून पुढील तपास चालू आहे. सदर गुन्ह्यातील आरोपी नं.१ ते ३ यांना दि.२२/०२/२०२२ रोजी २२.५० वाजता अटक करण्यात आली.
सदरची कारवाई . प्रकाश गायकवाड, अप्पर पोलीस अधीक्षक, पालघर तथा प्रभारी पोलीस अधीक्षक, पालघर यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीमती नीता पाडवी, उपविभागीय पोलिस अधिकारी पालघर विभाग, सहा. पोलीस निरीक्षक श्री. संदीप कहाळे, प्रभारी अधिकारी सफाळा पोलीस ठाणे यांनी व सफाळा पोलीस ठाण्याचे अधिकारी कर्मचारी यांनी केली.