पालघर जिल्ह्याला मोठ्या प्रमाणात समुद्र किनारा लाभला आहे. पर्यटनासाठी जिल्ह्यात अनेक समुद्र किनारे प्रसिद्ध असल्यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दीसुद्धा होताना दिसते. केळवा समुद्र किनाऱ्यावर दोन मुले पोहण्यासाठी गेली होती. पाण्याचा अंदाज न आल्यामुळे बुडू लागली त्यांना वाचवण्याच्या प्रयत्नामध्ये ४ जण बुडाले असल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. यामध्ये चार तरुणांचा समावेश आहे.
केळवा बीचवर एक स्थानिक असलेला मुलगा बुडत असल्यामुळे नाशिकच्या तीन विद्यार्थ्यांनी पाण्यात उडी मारून त्याला वाचवण्यासाठी गेले असता. ओहोटी आणि पाण्याचा अंदाज न आल्यामुळे मुलं बुडू लागली. बचावासाठी प्रयत्न करत असल्याची बाब काही जणांच्या निदर्शनास आली. एका मुलाला वाचवण्यासाठी तीन जणांनी पाण्यात उडी मारली. परंतु त्यांना पाण्याचा अंदाज नसल्यामुळे ते सुद्धा या मध्ये बुडाले.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. पोलीस स्थानिकांच्या मदतीने मृतदेहांचा शोध घेत असताना.
नाशिक मधील ब्रह्मा वेली कॉलेज चे ३९ विद्यार्थी सहलीसाठी आज केळवे बीच येथे आहे होते. या वेळी केळवे येथील स्थानिक मुलं बुडत असल्याचं पाहून नाशिक येथील मुलांनी त्यांना वाचवण्यासाठी पाण्यात उडी घेतली आणी त्यापैकी तीघाचा बुडून मृत्यू झाला आहे. तर एका विद्यार्थ्याला वाचवण्यात आले आहे .ओम विसपुते,कृष्णा शेलार,दीपक वडकाते हे दोघं नाशिक आणि मुकेश नाकरे अश्या चार जणांचा मृत्यू झाला आहे.
केळवे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात त्यामुळे समुद्रामध्ये आंघोळ करणाऱ्या पर्यटकांसाठी स्थानिक ग्रामपंचायत ठिकाणी जीव रक्षकाची नेमणूक करणे गरजेचे आहे ग्रामपंचायती प्रशासनाने याठिकाणी पर्यटकांकडून व पार्किंग व्यवस्था पर्यटन कर मोठ्या प्रमाणात लावल्यामुळे या ठिकाणी जीव रक्षकांची नेमणूक करणे ही ग्रामपंचायतीची जबाबदारी असल्याबाबत पर्यटकांकडून चर्चिले जात आहे
गेल्या अनेक वर्षापासून पर्यटन स्थल असल्यामुळे मोठ्या प्रमाणात कराच्या माध्यमातून ग्रामपंचायतीला उत्पन्न मिळते मात्र ग्रामपंचायत जीव रक्षक ठेवण्यास टाळाटाळ का करते
त्यामुळे पालघर जिल्हा प्रशासन विभागाने ग्रामपंचायत केळवे यांना नोटीस देत जीव रक्षक ठेवण्याबाबत आदेश काढावा म्हणून पर्यटन व या भागातील नागरिकांनी मागणी केली आहे