पत्रकारांना दुखापत करण्याबाबत झाली हाँटेल मध्ये चर्चा; स्थानिक गुन्हे शाखा व पोलिस अधीक्षक यांच्या कडे तक्रार दाखल
बोईसर: शहरात मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढत असताना पोलिसांनी मात्र याकडे दुर्लक्ष केले आहे. यातच आता गुन्हेगारीच्या उंबरठ्यावर बोईसर शहरात ड्रग्स माफियांचा हैदोस वाढला आहे. येथील अनधिकृत हाँटेल मध्ये बसुन हा धंदा चालवला जातो की काय असा सवाल देखील उपस्थित होत आहे. बोईसर मधील अमली पदार्थ विक्री करणारा माफिया मोकाट असून त्याबद्दल नागरिकांनी तक्रार देवुन देखील बोईसर पोलिसांनी बघ्याची भुमिका घेतली आहे. महत्त्वाचे म्हणजे ड्रग्स माफिया बाबत लिखाण करणाऱ्या पत्रकारांना दुखापत करण्याबाबत कट रचला जात असल्याची तक्रार पोलिस अधीक्षक यांच्या कडे दाखल करण्यात आली आहे.
बोईसर शहरात ड्रग्स माफियांचा गोरखधंदा जोमाने सुरू असताना देखील कायद्याचे रक्षण करणारे बोईसर पोलिस अमली पदार्थ विकणाऱ्यांचा छडा लावु शकलेले नाहीत. येथील निल्या उर्फ निलेश सुर्वे या इसमा विरोधात भंडार वाडा या भागातील नागरिकांनी 13 जुलै 2021 रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी, बोईसर यांच्या कडे तक्रार देण्यात आली होती. नागरिकांनी तक्रार करून निल्या उर्फ निलेश सुर्वे हा ड्रग्स विकतो असे लेखी पोलिसांना कळवले असताना देखील अनेक महिन्यांन पासुन कोणत्याही प्रकारची कारवाई केलेली नाही. बोईसर भंडार वाडा, भवानी चौक, रेल्वे परिसर तसेच साईबाबा मंदिर पालघर रोड परिसर अशा अनेक ठिकाणी काही तरूणांच्या मदतीने अमली पदार्थांचा गोरखधंदा जोमाने चालवला जात आहे. अनेक प्रकरणाचा छडा लावणाऱ्या बोईसर स्थानिक गुन्हे शाखेला मात्र आजपर्यंत बोईसरच्या अमली पदार्थ विक्रीचा छडा लावता आलेला नाही.
अमली पदार्थ विक्री करत असल्याचा खुद्द नागरिकांनी आरोप केलेला निल्या उर्फ निलेश सुर्वे हा इसम सरावली भागात चिन्मय शाळेच्या बाजूला असलेल्या सनसाईन या अनधिकृत बार मध्ये बसुन आपला कारोबार चालवत आहे. याचे कारण असे की, येथील टँरेस वर निलेश सुर्वे साठी बैठक व्यवस्था असून याठिकाणी 3 मार्च 2022 रोजी सायंकाळी 7 ते रात्री 9 वाजेपर्यंत नीलेश सुर्वे, माया, चौगुले अशा अनेक लोकांनी पत्रकारांना जिवीतास धोका पोचविण्याचा कट रचल्याची खात्रीशीर माहिती समोर आली होती. बातमीची सत्यता पडताळून याबाबत गांभीर्य लक्षात घेवुन पत्रकार प्रमोद तिवारी यांनी पोलिस अधीक्षक पालघर, व स्थानिक गुन्हे दाखल बोईसर युनिटला लेखी तक्रार देवुन संपूर्ण माहिती सांगितली आहे. तातडीने केलेल्या तक्रारी बाबत कोणत्याही चौकशी झालेली नाही. विशेष म्हणजे 5 मार्च रोजी देखील याच ठिकाणी दुपारच्या वेळेस देखील निल्या याठिकाणी बसुन राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांन सोबत बैठक घेत असल्याचे समोर आले आहे.
◾️बोईसरच्या सनसाईन हाँटेल मध्ये ड्रग्स विक्रीचा आरोप असलेला निल्या करतोय बैठका घेत असून याठिकाणी अवैध धंद्यांना तडीस नेण्यासाठी चर्चा केली जात असल्याची खात्रीशीर माहिती समोर आली आहे. हे हाँटेल देखील अनधिकृत बांधकाम करून उभारण्यात आले आहे. याठिकाणी शनिवारी 5 मार्च रोजी दुपारी 3 वाजता पासून निल्या उर्फ निलेश सुर्वे हा याठिकाणी टँरेस वरती बनवलेल्या अनधिकृत हड्यावर बसला होता. विशेष म्हणजे यावेळी त्यांच्या सोबत मनसेचा पदाधिकारी म्हणून दाखवत असलेला उदय माने हा देखील असल्याचे दिसून आले आहे. यामुळे राजकीय पक्षांच्या पदाधिकारी यांच्या सोबत संगणमत करून नेमका कोणता गोरखधंदा चालवला जातो याबाबत पोलिसांनी चौकशी करणे गरजेचे आहे. सनसाईन हाँटेल मध्ये सुरू असलेले गुन्हेगारी लोकांचे अवैध धंदे याबाबत हाँटेल मधील सीसीटीव्ही चित्रीकरण मिळावे यासाठी हाँटेल भाडेतत्त्वावर चालवत असलेल्या रमाकांत पुजारी यांच्या कडे विचारणा केली असता त्यांनी कोणतीही माहिती व विडीओ चित्रीकरण देण्यासाठी नकार दिला.
◾️उदय माने यांच्या कडे कोणतेही पद नसुन त्यांचे पद बरखास्त झालेले आहे. पक्षांच्या कोणत्याही अधिकृत बैठकीला उदय माने उपस्थित राहत नाही. तसेच ड्रग्स माफिया आरोप असलेल्या व्यक्ती सोबत तो फिरत असेल तर तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. यामध्ये पक्षांचे नाव बदनाम होऊ नये.
— समिर मोरे, जिल्हा अध्यक्ष, पालघर ग्रामीण