मर्चंट नेव्ही हे असं क्षेत्र आहे जिथे आकर्षक पगार च्या बदल्यात तुम्हाला अनेक गोष्टींचा त्याग करावा लागतो. सलग सहा महिने समुद्रावर प्रवास सोशल लाईफला मुरड घालावी लागण.आणि जगभरातील हवामानाशी जुळवून घेत प्रवास करावा लागणं.ही या क्षेत्रातील प्रमुख आव्हानं…..
मर्चंट नेव्हीच्या या खडतर क्षेत्रात जगभरात महिलांचं प्रमाण 2 टक्के आहे,तर भारतात केवळ 0.5 टक्के,यावरूनच हे क्षेत्र महिलांसाठी किती आव्हानात्मक आहे यांचा अंदाज आपण बांधू शकतो.
आणि अशा क्षेत्रात डहाणूतील एक मराठी मुलगी आपल्या कर्तुत्वाचा ठसा उमटवला. तिचं नाव शबीना जीवाजी डहाणूच्या मराठी मुस्लिम कुटुंबात जन्माला आलेली मच्छिमारांची ही लेक आज डेन्मार्कच्या “टॉर्म” या शिपिंग कंपनीत सेकंड इंजिनियर या जबाबदारीच्या पदावर काम करते. समुद्राच्या लाटा वर स्वार होण्याचे आव्हान स्वीकारताना शबिना या क्षेत्रात दाखल झाली. मुस्लिम समाजातील चौकटीत भेदत तिचाj प्रवास हा आणखी कौतुकास्पद ठरतो.
त्याच प्रमाणे पालघर नागरिक सुद्धा यांना सलाम आहे.व पुढील वाटचालीस शुभेच्छा देत आहोत.