Palghar Nargrik

Breaking news

बारावीचा आणखी एक पेपर फुटला; शिक्षणाधिकाऱ्यांकडून तपास सुरू………

राज्यात १२वीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा सुरू आहे. आज गणित या विषयाचा पेपर होता. परंतू हा पेपर फुटला आणि 10 वाजताच उत्तर पत्रकेसह सोशल मीडियावर व्हायरल झाल्याची माहिती समोर आली आहे.

पेपर अहमदनगर जिल्ह्यात नक्की कोणत्या केंद्रातून फुटला याबाबत तपास करण्यासाठी शिक्षणाधिकारी श्रीगोंदयात दाखल झाले आहेत.

बारावीचा केमिस्ट्रीचा पेपर फुटला; खासगी क्लासच्या शिक्षकाला अटक

बारावीचा केमिस्ट्रीचा पेपर फुटल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. शनिवारी घेण्यात आलेल्या केमिस्ट्रीचा पेपर फुटल्याचं उघड झालंय. या प्रकरणी मालाडच्या खासगी क्लासेसच्या प्रोफेसर मुकेश यादवला अटक करण्यात आली आहे.

शालेय शिक्षणमंत्री म्हणतात, तो पेपर फुटलाच नाही

विलेपार्ले येथील बारावीच्या परीक्षा केंद्रावर रसायनशास्त्रचा (केमिस्ट्री) पेपर फुटल्याची घटना घडली. याप्रकरणी एका व्यक्तीला अटक करण्यात आलीय. याबाबत गुन्हा दाखल झाला असून चौकशी सुरु आहे, अशी माहिती राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी विधान परिषदेत दिली.

विद्यार्थ्यांना १० मिनिटे आधी प्रश्नपत्रिका वाटली जाते. त्यानुसार रसायनशास्त्र विषयाची प्रश्नपत्रिका १०.२० वाजता वितरित करण्यात आली. मात्र, एका विद्यार्थिनीला येण्यास उशीर झाला होता. तिचा फोन चेक केला असता प्रश्नपत्रिकेचा काही भाग मोबाईलमध्ये १०.२४ वाजता आढळून आला.

बारावी रसायनशास्त्रचा हा संपूर्ण पेपर फुटला नाही. त्यातील काही भाग त्या विद्यार्थिनीच्या मोबाईलमध्ये आढळून आला. त्या विद्यार्थिनीच्या चॅटनुसार या प्रकरणाची सखोल चौकशी सुरु असल्याचं वर्षा गायकवाड यांनी सांगितलं. हा मुद्दा विधान परिषदेत विरोधी पक्षाकडून विचारण्यात आला होता.

कॉपी बहाद्दरांना शिक्षण मंडळाचा दणका

कॉपी बहाद्दरांना शिक्षण मंडळाने दणका दिला आहे. सध्या बारावीची परीक्षा सुरू आहे. या परीक्षेत आतापर्यंत 41 विद्यार्थी कॉपी करताना आढळून आले. एकाच दिवसात एवढ्या मोठ्या प्रमाणात कॉपी बहाद्दर सापडल्याने शिक्षण मंडळाने विद्यार्थ्यांना नापास करण्याचा आदेश दिला आहे. या प्रकरणी कॉपी करणा-या तीन विद्यार्थ्यांना अटकही करण्यात आलीय.

Leave a Comment