Palghar Nargrik

Breaking news

रिपाई (आ) पालघर जिल्ह्याच्या वतीने मा. जिल्हाधिकार यांना पालघर जिल्ह्यातील विविध समस्या संदर्भात रिपाई (आ) चे जंबो शिष्टमंडळ चे सोबत चर्चा करण्याबाबत समस्यांचे निवेदन आज देण्यात आले……

आज दिनांक ११ एप्रिल २०२२ रिपाई (आ) पालघर जिल्ह्याच्या वतीने मा. जिल्हाधिकारी  यांना पालघर जिल्ह्यातील विविध समस्या संदर्भात रिपाई (आ) चे जंबो शिष्टमंडळ चे सोबत चर्चा करण्याबाबत समस्यांचे निवेदन आज देण्यात आले.
ठाणे जिल्ह्याचे विभाजन होऊन पालघर जिल्ह्याची निर्मिती १ ऑगस्ट २०१४ रोजी झाली परंतु पालघर जिल्ह्यातील विविध समस्यांचे निरासरण झाले नाही खालील विषयांवर जंबो शिष्टमंडळ येणार असून संबधित अधिकाऱ्यांना बोलविण्यात यावे.
१. जिल्ह्यात सामाजिक न्याय भवन (आंबेडकर भवन) साठी जागा मंजूर झालेली आहे परंतु भवन निर्माण झालेले नाही.
२. जिल्ह्यात सुसज्ज सिव्हील रुग्णालय व तज्ज्ञ डॉक्टर याबाबत चर्चा करणे.
३. जिल्हयातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविणे.
४. दलित वस्तीकरीता आलेला निधी त्या घटकांसाठीच वापर करणे या विषयावर चर्चा करणे.
५. जिल्ह्यातील विविध कार्यालयात नोकर भरती करताना स्थानिकांना प्राधान्य द्यावे या बाबत चर्चा करणे.
६. जिल्ह्यातील भूमिहीन गरीब लोकांना उदरनिर्वाहासाठी ५ एकर जागा मिळावी या बाबत चर्चा करणे.
७. जिल्ह्याला जोडणारे मुख्य रस्ते नादुरुस्त व PWD मार्फत ग्रामीण भागात जे रस्ते बनविले जात आहेत ते वर्षभरात खड्डेमय होत आहेत त्या बाबत चर्चा करणे.
८. ज्या कॉन्ट्रॅक्टर मार्फत रस्त्याची देखभाल अथवा निकृष्ट दर्जाचे रस्ते व बांधकाम केले जाते त्यांचे परवाने रद्द करणे या बाबत चर्चा करणे.
९. MSED च्या मनमानी कारभाराबाबत चर्चा करणे.
१०. जिल्ह्यातील बोगस डॉक्टर यांच्यावर कारवाई करणेबाबत चर्चा करणे.
११. जिल्ह्यातील ग्रामीण भागात मोखाडा, विक्रमगड, जव्हार, तलासरी येथे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भेडसावत आहे त्याबाबत चर्चा करणे.
व इतर समस्यांबाबत चर्चा करण्यासाठी आमच्या रिपाई (आ) च्या शिष्टमंडळाला योग्य ती वेळ देऊन सर्व प्रश्न सोडविण्यासाठीचे निवेदन देण्यात आले त्या समयी रिपाई (आ) पालघर जिल्हाध्यक्ष आयु. सुरेश जाधव, उपाध्यक्ष कुंदन मोरे, महिला सचिव आशाताई दहाट, जिल्हा कार्याध्यक्ष रत्नाकर भालेराव, युवा तालुका अध्यक्ष शरद जाधव, शहर उपाध्यक्ष राम ठाकूर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Comment