Palghar Nargrik

Breaking news

प्रवाशांची लाडकी लालपरी पुन्हा पूर्वपदावर; ST महामंडळाच्या उत्पन्नातही मोठी वाढ…….

गेल्या 6 महिन्यांपासून राज्यातील ‘एसटी’ सेवा विस्कळीत झाली होती. एसटी कामगारांचा संप सुरू होता. परंतू न्यायालयाच्या निकालानंतर एसटी कामगार आता पुन्हा कामावर रुजू होत आहेत. एसटीची सेवा पूर्वपदावर येत असल्याचं दिसतंय.

राज्यातील 50 टक्क्यांहून अधिक संपकरी कर्मचारी कामावर पुन्हा रुजू झाले आहेत. एकूण 81 हजार कर्मचाऱ्यांपैकी गुरूवारी अखेर 41 हजार कर्मचारी रुजू झाल्याची माहिती समोर आली आहे. कोर्टाच्या आदेशानंतर कर्मचाऱ्यांना तातडीने सेवेत पाठवण्याच्या हालचालींना वेग आला आहे. राज्यात 16 हजार फे-या सुरू झाल्या आहेत.

एसटीची सेवा हळुहळू सुरू झाल्यान महामंडळाला रोज 13 कोटींचं उत्पन्न येऊ लागलंय. तब्बल सहा महिन्यांपासून दुरावलेली सर्वसामान्यांची हक्काची एसटी आता पुन्हा प्रवासी सेवेत दाखल होत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे.

Leave a Comment