Palghar Nargrik

Breaking news

ठाणे आरटीओ मध्ये स्टिंग ऑपरेशन,भ्रष्टाचाराची पोल खोल…..

ठाणे आरटीओ मध्ये कुठलही काम करायचे झाल्यास पैसे मोजावे लागतात, एक्सप्रेस हायवेच्या सर्व्हिस रोड वर असलेल्या या आरटीओ कार्यालया जवळ तुम्ही गेलात तर गेटच्या दोन्ही बाजूला दलालांच्या लहान लहान टपाऱ्या दिसतात हे लोक पैसे घेऊन कुठलही अवघड काम लिलया करू शकतात, त्यांचे आणि आतील अधिकाऱ्यांचे साठेलोटे असते, आरटीओ मध्ये जर तुम्ही पक्के लायसन्स काढायला गेलात तर तुम्हाला तिथे गाडीची टेस्ट द्यायला लागते ,सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी व मोटार वाहन निरीक्षक ही टेस्ट घेतात,या टेस्ट मध्ये बरेच जण नापास होतात पण या अधिकाऱ्यांनी अशा लोकांकडून पैसे घेण्यासाठी प्रायव्हेट माणसं ठेवली आहेत हे लोक अशा नापास झालेल्या लोकांकडून पैसे घेऊन त्यांना लगेच पास करतात, हा प्रकार सर्रास काही वर्षांपासून सुरु आहे, या बद्दल बऱ्याच लोकांनी तक्रारी केल्या पण कुठलीही कारवाई आता पर्यंत झाली नव्हती, या बाबतची माहिती समाज सेवक बिनु वर्गिस यांना कळल्या नंतर त्यांनी स्टिंग ऑपरेशन करत या गोष्टीचा भांडाफोड केला, त्या नंतर चमत्कार झाला आणि नापास होणाऱ्यांचे प्रमाण वाढले, दिनांक 04/05/2022 झालेल्या ड्राइविंग टेस्ट मध्ये 45 पैकी 16 उमेदवार टेस्ट मध्ये नापास झाले आहेत
असे आज पर्यंत कधी झाले नाही की इतक्या प्रमाणात उमेदवार नापास झाले असतील
हे श्री बिनु वर्गीस यांनी स्टिंग ऑपरेशन केल्यानंतर वसुली बंद झाल्यामुळे एवढे नापास झाले नाहीतर अगोदर 2 किंवा 3 जणच नापास होत,आणि या नंतर वसुली करणारे सगळे प्रायव्हट दलाल गायब झाले आहेत.

 

Leave a Comment