मुबंई :- बांधकाम व्यवसायिक अश्विन नटवरलाल शेठ वय 61 वर्ष यांनी आपली पत्नी व दोन मुलांवर आपलं राहत घर फसवणूकीच्या माध्यमातून आपल्या पत्नीने नावावर केल्याच्या गंभीर आरोप केला आहे व त्यांच्या वर जुहू पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केली सगळ्या गोष्टींचा शहानिशा करून जुहू पोलिसांनी रेणुका शेठ,चिंतन शेठ, मौलिक शेठ यांच्यावर 339,406,420,425,426,440,441,442,455,443,452,506,34,445 अशा विविध कालमा खाली गुन्हा दाखल केला आहे.
या बद्दल थोडक्यात माहिती अशी अश्विन नाटवरलाल शेठ हे एक बांधकाम व्यवसायिक आहेत आणि सध्या त्यांचे वय 61 वर्ष आहे, ते विलेपार्ले येथील नटवर हटकेश को ऑप हौ सोसायटी मध्ये 5,6,7 मजल्यावर राहतात त्यांची पत्नी रेणुका शेठ हिच्या बरोबर त्यांचा विवाह 1984 साली झाला होता, त्यांना चिंतन व मौलिक अशी 33 वर्षाची दोन मूल असून फ्लोरा नावाची 26 वर्षाची मुलगी आहे,अश्विन शेठ आणि त्यांची पत्नी यांच्यात काही कारणास्तव वैवाहिक वाद निर्माण झाला, त्या मुळे त्यांची पत्नी मुलगी फ्लोरा हिच्या बरोबर 5 व 6 व्या माळ्यावर राहते , त्या दोघांमध्ये वाद निर्माण झाल्या मुळे,वैवाहिक वादा बद्दल त्यांच्या पत्नीने बांद्रा येथील कौटुंबिक कोर्टात याचिका दाखल केली आहे, आणि ही याचिका सुनावणीसाठी प्रलंबित आहे, दिनांक 8/3/2022 रोजी अश्विन शेठ बाहेरगावी असल्याचा फायदा घेऊन त्यांच्या पत्नीने आणि मुलगा चिंतन याने बाहेरच्या चाविवाल्याला बोलावून त्यांच्या 7 व्या मजल्यावरील घराचे कुलूप तोडले आणि त्यांच्या घरात बेकायदेशीर प्रवेश केला आणि दुसरे कुलूप आणून लावले व त्यांना घरात मज्जाव करण्यासाठी त्यांच्या सुरक्षा रक्षकांना तेथून हाकलून दिले व दुसरे स्वतःजवळचे तिन चार माणसे आणून तिथे गेटवर बसवली या मध्ये त्यांचा चिंतन या मुलाचा सासरा सुद्धा सहभागी आहे, या झाल्या प्रकारा बद्दल अश्विन शेठ यांना जीवाला धोका असल्याचे जाणवून त्यांनी 9 मार्च 2022 रोजी जुहू पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती,या अगोदर मागच्या वर्षी श्रीमती रेणुका शेठ ही अश्विन शेठ वर एक सारखा दबाव टाकत होती,तसेच त्यांच्या वर कोर्टात केस टाकल्या मुळे समाजात बदनामी होईल म्हणून त्यांनी पत्नीचे वकील लालवाणी यांच्या तर्फे समझोता करार करण्यात आला, त्या मध्ये अश्विन शेठ वर टाकलेली केस मागे घेणे, त्यांना आतापर्यंत पाठवलेल्या सगळ्या नोटीसा मागे घेणे, त्या बदल्यात पत्नीच्या नावावर 5,6,7 मजल्यावरील घर गिफ्ट दीड करून देणे असे ठरले, त्या प्रमाणे वकील लालवाणी व त्यांच्या पत्नीवर विश्वास ठेऊन अश्विन शेठ यांनी दिनांक 10/12/2021 रोजी पत्नीच्या नावे कुलमुखत्यारपत्र करून दिले आणि त्याची मूळ प्रत् त्यांनी त्यांच्याकडेच ठेवली कारण समझोता करारा प्रमाणेत्यांच्या पत्नीने कोर्टाची केस मागे घेतल्यानंतर, सगळ्या नोटीस मागे घेतल्या नंतर कुलमुखत्यार पत्राची अदलाबद्ल करण्यात येणार होती, पण त्याच्या पत्नीने परत नविन अटी शर्थी घालून नविन करार दिला व त्यांच्यावर दबाव टाकू लागली त्या मुळे त्यांच्यात वाद होऊन त्यांच्यातला समझोता करार तुटला, त्या प्रमाणे अश्विन शेठ यांनी 10/12/2021 रोजी कुलमुखत्यार पत्र रद्द केल आणि त्याची माहिती 1/3/2022 रोजी पत्नीस कळवली आणि 4/3/2022 रोजी उपनिबंधक् कार्यालयात येऊन कुलमुखत्यार पत्र रद्द करण्या साठी येण्यास सांगितले पण त्यांची पत्नी, व दोन मुलांनी कुलमुखत्यार पत्र रद्द करण्यास नकार दिला, आणि त्यांनी 1/3/2022 रोजी कुलमुखत्यार पत्र रद्द केले असताना दिनांक 11/3/2022 रोजी त्यांची हरकत असताना, खोटी व दिशाभूल माहिती देऊन त्यांच्या पत्नीच्या नावाने डीड करून घेतले, त्या मुळे अश्विन शेठ यांनी आपल्या 15 कोटी पेक्षा जास्त बाजारमूल्य असलेल्या निवासी घरांचा अपहार केल्याची जुहू पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा नोंद केला .