truck-bus accident in Karnataka : बातमी एका भीषण अपघाताची. कर्नाटकातील हुबळीच्या हद्दीत आज सकाळी एका प्रवासी बसची एका ट्रकला जोरदार धडक बसली. या भीषण रस्ता अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला असून 26 जण जखमी झाले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.
कर्नाटकमध्ये ट्रक आणि बसचा भीषण अपघात इतका भयंकर होता की, बसचा चुराडा झाला आहे. या दुर्घटनेत आठ जण ठार झालेत तर 26 जण गंभीर जखमी झालेत. हा अपघात हुबळी-धारवाडच्या तरीहाळा बायपासवर घडला. यातील मृतांमध्ये दोघे हे कर्नाटकमधील तर 6 जण कोल्हापुरातील आहेत. तसेच पुण्यातीलही काही नागरिकांचा समावेश आहे. दरम्यान जखमींवर हुबळीच्या किम्स रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
हुबळी भागात प्रवासी बस आणि ट्रक यांच्यात भीषण अपघात झाला. यात दोन्ही गांड्यांचे मोठे नुकसान झाले आहे. बसचा चक्काचूर झाला असून बसमधील प्रवाशांवर काळाने घाला घातला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कर्नाटकातील हुबळी भागात मंगळवारी पहाटे एका प्रवासी बसची भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकला धडक बसून हा अपघात झाला. ही धडक इतकी जोरदार होती की बसच्या काचा फुटल्या आणि बस चिरडल्यानंतर पलटली. या अपघातात बसमधील आठ प्रवाशांचा मृत्यू झाला असून 26 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर एकच खळबळ उडाली आहे.
अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ दाखल झालेत. त्यांनी या अपघाची माहिती घेतली. मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.