ED raids 7 places of Shiv Sena leader Anil Parab :आताची सर्वात मोठी बातमी. महाविकास आघाडी सरकारमधील शिवसेनेचे मंत्री अनिल परब यांच्यासंबंधित 7 ठिकाणी ईडीने छापेमारी केली आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे. भाजपनेते किरीट सोमय्या यांनी अनिल परब यांच्यावर आरोप केला होता. त्यांनी याबाबत तक्रार केली होती. (ED searches are on in Maharashtra at seven location on premises linked to Maharashtra minister Anil Parab)
शिवसेना पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या जवळच्यांपैकी एक मानले जाणारे राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या संबंधित सात ठिकाणी ईडीने कारवाई करताना छापेमारी केली आहे. अनिल परब यांच्या मालमत्तांवर ईडीचे छापे हे दापोली रिसॉर्ट आणि इतर ठिकाणी ही छापेमारी सुरु केली आहे.
दरम्यान, याआधी अनिल परब यांच्या सीएच्या घरी आयकर विभागाने छापेमारी केली होती. अनेक ठिकाणी आयकर विभागाने छापेमारी केली होती. अनिल परब यांचे सीए आता आयकरच्या रडारवर होते.