महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री अनिल परब यांचे सर्व घोटाळे बाहेर काढणार आहे. त्यांचा सातबारा मी कोरा करणार आहे, असे थेट आव्हान भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी दिले आहे. ते पुढे म्हणाले, अनिल परब म्हणतात ‘तो मी नव्हेच’. मग साई रिसॉर्टचा टॅक्स अनिल परब यांनी कसा भरला. दापोलीतील रिसॉर्टचा प्रॉपर्टी टॅक्स भरल्याची पावती यावेळी सोमय्या यांनी दाखवली.
दरम्यान, मंत्री आणि शिवसेना नेते अनिल परब यांच्याशी संबधित 7 ठिकाणी ईडीने काल छापेमारी केली. या प्रकरणी बोलताना भाजप नेते किरीट सोमय्या यांनी अनिल परब यांच्यावर टीका केली आहे.
नोव्हेंबर 2021 मध्ये राज्य सरकारने मान्य केलं की मंत्री परब यांचा रेसॉर्ट बेकायदेशीर आहे. हे रेसॉर्ट पाडण्याचे आदेश राज्य सरकारने दिले. अनिल परब यांना दिलेली मुदत संपली आहे. सरकारने या रेसॉर्टचं वीज पाणी बंद करायला हवं. असे सोमय्या यांनी म्हटले.
‘सदानंद कदम हे अनिल कदम यांचे व्यवसायिक भागिदार आहेत. त्यांनी 5 कोटी 22 लाखांचा चेक दिला असे चार्टर्ड अकाउंटंट यांनी स्टेटमेंट दिलंय. 25 कोटींची प्रॉपर्टी माझी आहे. असं सांगतात परंतू ती दाखवता आलेली नाही. हा रेसॉर्ट बेनामी संपत्ती घोषित केली जाईल. असा मला विश्वास आहे. परब यांनी जे गुन्हे केले आहेत त्यामुळे त्यांना अटक व्हायलाच हवी’. अशी मागणी सोमय्या यांनी केली आहे.