पालघर:- IRB ची मुदत २५ मे २०२२ ला संपून IRB ची नवीन बहीण mep ही २५ मे रात्री १२ वाजल्यापासून टोल वसुलीचा कंत्राट घेण्यात आला आणि त्याने जुन्या म्हणजेच पूर्वीची टोल वसुली रक्कम वसुली सुरू ठेवली आहे,तसेच ठेका पूर्ण झाला तरी रक्कम जुनी ठेवून टोल वसुली का करण्यात येत आहे ??? आणि त्यामध्ये सुविधांची धज्या उडवण्यात आली. यामध्ये NHAI प्राधिकरण चे अधिकारि दोन्ही हात व पाय वरती करून बसले आहेत. NHAI च्या अधिकाऱ्याशी संपर्क केले असता ते यामध्ये उत्तर देण्यास तयार नाहीत , म्हणून मा.खासदार , श्री राजेन्द्र गावित साहेबांशी चर्चा करून चर्चेमधून त्यांनी आश्वासन दिला आहे की रस्ते दुर्घटना कमेटी वर तुमचा एक मेंबर घेतो.
आम्ही NH 48 इन्फॉर्मेशन ग्रुपच्या माध्यमातून तुम्हाला सांगू इच्छितो की हायवे वर वाहने सावकाश चालवा व तुम्ही स्वतः ची काळजी घ्या.
तुम्हाला ठेकेदार कं. ने कोणत्याही प्रकारची मदत केली नाही तर NH 48 इन्फॉर्मेशन ग्रुपच्या माध्यमातून तुम्हाला मदत मिळेल. टोल बूथ वर ठेवण्यात आलेल्या कम्प्लेंट बुक मध्ये आपण तक्रार अवश्य नोंदवा.
आपला प्रवास सुखाचा होवो , धन्यवाद.
आज दिनांक 8/6/2022 रोजी 4 वाजून 1 मिनिटे 7 सेकंदानी खनिवडे टोल नाक्यावर ज्याची मुदत सम्पली असताना देखील माझ्याकडून 150 रुपये बळजबरीने बेकायदेशीर घेतले आहे ,असयावेळी टोल कम्पनी अधिकारिंवर दरोड्याचा गुन्हा का दाखल होऊ नये ❓ जसे EMI सम्पल्यावर जर बॅंका परत सांगतील की आम्हाला 10 हप्ते आजून द्या ,तर असल्या वेळी आपण त्या बॅंकेचे मुस्काट फोडणार नाही का ❓ मग ही कुठली पद्धत आहे पैसे वसूल झाले तरी वसुली सुरू ❓ ही वसुली will full आहे ,हेतू पुरस्कृत आहे असा आमचा जाहीर आरोप आहे