Palghar Nargrik

Breaking news

गरुडाचा जीव वाचवण्यासाठी सी लिंकवर उतरले, स्वत:चा जीव गमावून बसले, भीषण अपघाताचा VIDEO

मुंबईतल्या वरळी सी लिंकवर (Sea Link) झालेल्या एका भीषण अपघाताचा व्हिडीओ (Video) समोर आला आहे. जखमी गरुड पक्षाचा जीव वाचवण्यासाठी अमर जरीवाला आणि त्यांचा चालक श्यामसुंदर कामत कार थांबून सी-लिंकवर उतरले. दोघे उभे असतानाच एका भरधाव टॅक्सीने दोघांना धडक दिली.

ही धडक इतकी भयानक होती की दोघेही अक्षरश: हवेत फेकले गेले. या अपघातात एकचा जागीच मृत्यू झाला तर दुसऱ्या व्यक्तीचा रुग्णालायात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

गरुड पक्षाचा जीव वाचवण्यासाठी अमर मनीष जरीवाला रस्त्यावर उतरले होते. अमर यांचा चालक श्याम सुंदर कामतही रस्त्यावर उतरला. रस्त्यावर भरधाव वेगाने गाड्या जात होत्या. तितक्यात दुसऱ्या लेनमधून येणाऱ्या भरधाव टॅक्सीने अमर आणि श्यामसुंदर यांना जोरदार धडक दिली. या धडकेने ते दोघंही हवेत फेकले गेले.

या भीषण अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अपघातात अमर जरीवाला यांचा जागीच मृत्यू झाला तर चालक श्यामसुंदर यांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. अमर हे प्राणी-पक्षांबदद्ल अत्यंत संवेदनशील होते, असं त्यांच्या कुटुंबियांनी सांगितलं. ते अनेकदा जखमी प्राणी-पक्षांची मदत करत असत.

अपघाताच्या दिवशी त्यांना एक जखमी गरुड सी-लिंकवर दिसला. गरुड कोणाच्यातरी गाडीखाली आला असता या काळजीपोटी अमर यांनी आपल्या चालकाला गाडी थांबवण्यास सांगितलं. तेव्हाच हा अपघात घडला.

दरम्यान, याप्रकरणी अमर यांच्या कुटुंबियांना टॅक्सी चालकाविरुद्ध कोणताही गुन्हा नोंदवलेला नाही.

Leave a Comment