राज्याच्या राजकारणात मोठी घडामोड घडत असताना शिवसेनेची महत्वाची बैठक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारी निवासस्थान वर्षा येथे पार पडली. या बैठकीला 27 आमदार उपस्थित होते. शिवसेनेला खिंडार पाडण्याचे काम मंत्री एकनाथ शिंदे करताना दिसत आहेत. ते स्वत: अनेक आमदारांसह नॉट रिचेबल आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे सरकार संकटात आले आहे. दरम्यान, एकनाथ शिंदे यांची नाराजी दूर करण्यासाठी मिलिंद नार्वेकर, रवींद्र फाटक सूरतला रवाना झाले आहेत.
दरम्यान, एकनाथ शिंदेंसह 35 आमदार सूरतच्या ग्रँड भगवती हॉटेलमध्ये आहेत, असा दावा करण्यात आला आहे. मात्र, सध्या सोशल मीडियावर एक यादी व्हायरल होत आहे. यात 22 आमदारांची नावे आहेत. त्यामुळे शिंदे यांच्यासोबत किती आमदार आहेत याची उत्सुकता कायम आहे. दरम्यान, शिवसेनेचे मिलिंद नार्वेकर सूरतला रवाना झाले आहेत. तर देवेंद्र फडणवीस यांचा निरोप घेऊन संजय कुटेही सुरतमध्ये दाखल झालेत. त्यामुळे राजकीय घडामोडीकडे लक्ष लागले आहे.
दरम्यान, शिवसेनेच्या बैठकीनंतर एकनाथ शिंदे यांना गटनेते पदावरुन तात्काळ हटविण्यात आले आहे. त्यामुळे आता शिंदे यांच्या भूमिकीकडे लक्ष लागले आहे. दरम्यान, भाजपकडून त्यांना उपमुख्यमंत्री पदाची ऑफर देण्यात आली आहे. त्यामुळे पुढील राजकीय घडामोडीकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
एकनाथ शिंदे यांना ‘मातोश्री’चे निष्ठावंत संबोधले जात होते, मात्र आता त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना झटका दिला. मात्र, शिवसेना नेतृत्वाने त्यांची पदावरुनच हकालपट्टी केली. दरम्यान, शिवसेना शक्तीप्रदर्शन करणार आहे. आज संध्याकाळी चार वाजता सेना भवनात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचं शक्तिप्रदर्शन होणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर उपस्थित आमदारांना सूचना देण्यात आल्यात. आम्ही साहेबांसोबत या घोषवाक्याखाली सगळे शिवसैनिक जमणार आहेत.
वर्षा निवासस्थानी बैठकीला 27 आमदार उपस्थित
1.वैभव नाईक
2. रविंद्र वायकर
3. गुलाबराव पाटील
4. दादा भुसे
5. संजय राठोड
6. मंगेश कुडाळकर
7. सुनिल प्रभू
8. आदित्य ठाकरे
9. प्रकाश फातर्पेकर
10. अजय चौधरी
11. राहूल पाटील
12. दिलीप लांडे
13.उदय सामंत
14. राजन साळवी
15. संतोष बांगर
16. सदा सरवणकर
17. उदय सिंग राजपूत
18. सुनील राऊत
19. संजय पोतनीस
20. रमेश कोरगावकर