मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर चारोटी, मनोर,घोडबंदर ते तलासरी पर्यंत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48 वर मोठमोठे खड्डे पडले असून वाहन चालकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. निष्पाप वाहन चालकांचे जीव सुद्धा या खड्ड्यांमुळे गेले आहेत. या टोल वसुली करणाऱ्यांवर सदोष मनुष्यधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी पर्यावरण विभागाचे अध्यक्ष समीर वर्तक यांनी केली असून त्यांनी खानीवडे टोल नाका बंद पाडला.
घोडबंदर पासून ते गुजरात राज्याला जोडणाऱ्या तलासरी पर्यंत च्या राष्ट्रीय महामार्गावर मोठ मोठे खड्डे पडले आहेत. मोठ्या प्रमाणात पाणी सुद्धा साठण्याचे प्रकार या पावसाळ्यामध्ये घडत आहेत मात्र महामार्ग प्राधिकरण या गोष्टीकडे कानाडोळा करत असल्याचा चित्र दिसत आहेत.तसेच त्यांच्याशी वेळोवेळी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. आज या उद्या या आपण याच्यावर बोलूया असे बोलले जाते. मात्र पुढे कोणत्याही प्रकारचे पाऊल उचलले जात नाही. महामार्गावर पाणी साचून वारंवार अपघात होण्याचे प्रमाण वाढले असताना याच्यावर महामार्ग विभाग किंवा टोल वसुली करणारे पथक डोळे झाक करत असल्याचे दिसून येत आहे. यावर बोईसर विधानसभेचे आमदार राजेश पाटील यांनी पत्रव्यवहार करून महामार्ग विभागाला तंबी देखील दिली होती. आमदारांच्या पत्राला देखील केराची टोपली दाखवण्यात महामार्ग विभाग मागे राहिला नाही.
तुम्ही जेव्हा लोकांकडून टोल वसुली करता तेव्हा प्रवाशांचा त्यांचा प्रवास सुखकर प्रवास झाला पाहिजे.यासाठी महामार्ग प्राधिकरण बांधील आहे. जर तुम्ही प्रवाशांना सुखकर प्रवास देऊ शकत नसाल तर तुम्हाला टोल घ्यायचा अधिकारही नाही. असे वर्तक यांनी सांगितले.
वाहन चालक आणि प्रवासी खड्ड्यांमुळे त्रस्त झालेले आहेत.
टोलवसुली नियमानुसार महामार्ग बांधणार्या कं. चे टोल वसुली कंत्राट संपल्यावर फक्त 40% टोलवसुली अपेक्षित असताना ईथे मात्र मागील दरानेच FAStag द्वारे आपोआपच पैसे कापले जातात.
महाराष्ट्रातील 65 टोल नाके या पूर्वी मुदत पूर्ण झाले अशी वास्तविकता मनसे प्रमुख श्री राज साहेब ठाकरे यांनी आंदोलन करुन लक्षात आणून दिल्यानंतर ,ते टोल वसूली नाके बंद झाले .
मग तोच नियम या दोन्ही टोल नाक्यावर लागू करण्यात यावे आणि जनतेची लूट थांबवावी.
या साठी आपसातील मतभेद बाजूला ठेवून , सर्व पक्षीय आणि संघटनांनी समाजासाठी पुढाकार घेऊन परत एकदा “खळ्ळखटक आंदोलनाची पुनरावृत्ती होऊन जाऊद्या”
जय हिंद जय महाराष्ट्र…