पूर्ण पणे टोल वसुली झाली असताना, वाहन व्यवसायाचे बारा वाजले असताना , परत शंभर टक्के टोलवसुली म्हणजे , ट्रान्सपोर्ट व्यवसाय खड्ड्यात.
वाहन मालक हि खड्ड्यात, वाहन चालक हि खड्ड्यात आणि खड्डे बुजवण्याचे काम करणारा हि खड्ड्यात.
वसई जवळिल चिंचोटी कामण येथे , जून 17 रोजी खड्डे भरताना तिनं लेबर काम करणाऱ्या मजूरांना ट्रक ठोकर मारून पसार झाला .एक दगावला , दोघे अत्यावस्थ.
27 जूलै रोजी पहाटे शिरसाट कोपर जवळ क्रेन च्या सहाय्याने दुर्घटना ग्रस्त वाहन बाजूला करताना ,मागून ट्रेलर धडकला , क्रेन चालका चा म्र्यूत्यू.
दहा दिवसात दोघांचा संसार उध्वस्त करणारी ठेकेदार कं. अजुन ही आपली औकात सोडण्यास तयार नाही .
महामार्गावरील खड्डे भरण्यासाठी फेकून दिलेला माल, हॉटमिक्स मटेरियल म्हणून वापरून त्यावर रोडरोलर फिरवण्या चे सोडून , धुमसाने कॉम्पेक्षन करताना दिसत आहे . स्थानिक मजुरां ना विना सुरक्षा , धोक्यात जिव घालून ,चालत्या वाहतूकिच्या प्रवाहात काम करण्यास भाग पाडले आहे .काही दुर्घटना घडल्यास कंपनी कर्मचाऱ्यांना शिक्षा होणार का ?
परत पाऊस आल्यावर हेच खड्डे उघडे पडणार आणि परत परत भरायच काम तज्ञ ठेकेदार मार्फत करून घेणार ,
पान खाऊन इंजीनियर झालेले हे काम चोर अधीकारी , अनुभव हिन पान टपरी छाप चूना लावण्यात धन्यता मानत आहेत.
पब्लिक है सब जानती है ,
सुधर जाओ वरना कोई ना कोई खड्डा तुम्हारा भी.
” राम नाम सत्य करेगा”
अपना काम बनता है ना भाड मे जावे जनता