Palghar Nargrik

Breaking news

महाराष्ट्र पुन्हा हादरला ! भंडारा येथे निर्भया प्रकरणाची पुनरावृत्ती, पीडित महिलेची स्थिती गंभीर……

धक्कादायक आणि अत्यंत चिड आणणारी बातमी. बेघर महिलेवर तिघांकडून अत्याचार करण्यात आला. (Homeless woman Sexual assaulted by three in Bhandara) त्यानंतर या पिडित महिलेवर धारदार शस्त्राने गंभीर वार करण्यात आले. यानंतर महिलेची प्रकृती चिंताजनक झाली असून तिला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. भयानक प्रकार समोर आल्याने राज्याला मोठा हादरा बसला आहे.

भंडारा जिल्ह्यात बेघर महिलेवर तीन नराधमांचा पाशवी बलात्कार केला. याप्रकरणी दोघा संशयितांना पोलिसांनी अटक केली असून एक आरोपी फरार आहे. दिल्लीतल्या निर्भयाकांडापेक्षाही भयानक बलात्काराचा प्रकार राज्यात भंडाऱ्यात घडल्याने मोठा धक्का बसला आहे. नागपूर रायपूर महामार्गावर कन्हाडमोह या खेडेगावात रस्त्याशेजारी गंभीर जखमी अवस्थेत दिसून आली. या महिलेवर तीन नराधमांनी पाशवी बलात्कार केलाय. एवढंच नाही तर बलात्काकानंतर या महिलेवर धारदार शस्त्राने वारही करण्यात आलेत.

या महिलेच्या गर्भाशयापर्यंतचा भाग अक्षरशः चिरला गेला आहे. तिची स्थिती अतिगंभीर आहे. नागपूर मेडिकल कॉलेजमध्ये तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. पहिल्या शस्त्रक्रियेनंतर महिलेची प्रकृती स्थिर आहे. पण अजूनही धोका टळलेला नाही.

पतीने वाऱ्यावर सोडल्यामुळे ही महिला बेघर झाली होती. तिच्या असहाय्यतेचा फायदा घेऊन तिघांनी तिच्यावर अत्याचार केलेत. पोलिसांनी दोन संशयित आरोपींना अटक केली आहे, तर एक आरोपी फरार आहे. त्याचा शोध पोलीस घेत आहेत. या आरोपींनी महिलेला वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन अत्याचार केला होता.

नागपुरात उपचार सुरु असलेल्या पिडितेवर डॉक्टरांनी एक शस्त्रक्रिया केली आहे. तर पुढील तीन दिवसात तिच्यावर अजून एक शस्त्रक्रिया होणार आहे. 30 जुलै ते 2 ऑगस्ट दरम्यान 35 वर्षीय महिलेवर कनहाडमोह गावाजवळ वेगवेगळ्या आरोपींनी सामूहिक बलात्कार केला होता. त्यानंतर ही पिडित महिला गावकऱ्यांना गंभीर अवस्थेत महामार्गाच्या शेजारी आढळली होती. सुरुवातीला तिला भंडाराच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र तिची गंभीर अवस्था लक्षात घेत तिला नागपूरच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Leave a Comment