स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवी निम्मित एक भेट
आपला भारत देश स्वतंत्र होऊन आज ७५ वर्ष पूर्ण झाले आहे.आणि एकीकडे शिंदे सरकारने महाराष्ट्रातील जनतेला ह्या अमृत महोत्सवानिमित्त एक बोनस दिला आहे .स्वतंत्रच्या अमृत महोत्सवी राज्यातील काही विशिष्ट जनतेला महाराष्ट्र सरकारने मोफत प्रवास अशी घोषणा केली. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी राज्यातील ७५ वर्ष पूर्ण केलेल्या नागरिकांना मोफत एस टी प्रवास अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. हा प्रवास फक्त ज्या नागरिकांचे ह्या वर्षी वय ७५ पूर्ण आहे असेच करू शकतील. सदर घोषणा मुख्यमंत्री महोदय यांनी मंगळवारी केली आहे.राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे.या अनुषंगाने शिंदे सरकारने ज्या व्यक्तीचे वय पूर्ण ७५ आहे त्यांना एसटी प्रवास मोफत केला आहे. सदर प्रवास एकप्रकारचा बोनसच दिला आहे.
महाराष्ट्र शासनाची लालपरी अशी ओळख असलेल्या एसटी महामंडळाकडून विविध घटकांना सवलतीमध्ये प्रवासाची सूट दिली जाते. यामध्ये ज्येष्ठ नागरिकांना तिकिटात ५० टक्के सवलत आहे.पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आतातर ७५ वर्ष पूर्ण केलेल्या नागरिकांना एसटीचा मोफत प्रवास करता येणार आहे. अशी घोषणा केली आहे.