Palghar Nargrik

Breaking news

तीन आमदार, एक खासदार असूनही वरळीत मैदान मिळाले नाही, आदित्य ठाकरे बोलले…

मुंबई, ठाण्यात आज दहीहंडीचा मोठा उत्साह आहे. ठाण्यात टेंभी नाका येथील दहीहंडीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थिती लावली. दुसरीकडे युवासेना नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे  यांनीही मुंबईत वरळीसह भायखळा येथे आयोजित दहीहंडीमध्ये हजेरी लावली. सर्वत्र दहीहंडीचा खूप उत्साह आहे. दहीहंडीला मी अनेक ठिकाणी फिरणार आहे. या उत्सावाची वेगळीच मजा असते, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

दहीहंडी आयोजित करण्यासाठी वरळीतील जांबोरी मैदानाबाबत आदित्य ठाकरे यांना प्रश्न विचारण्यात आला. दहीहंडीसाठी जांबोरी मैदान मिळावं यासाठी आम्ही अर्ज केलाच नव्हता. आजचा अनंदाचा दिवस आहे. तो सर्वांनी उत्साहात साजरा करावा. यामळे पोरकट राजकारणात मला जायचं नाही, असं म्हणत जांबोरी मैदानाच्या मुद्द्यावरून आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटाला टोला लगावला.

वरळीतील जांबोरी मैदानाच्या विकासाबाबत आदित्य ठाकरे यावेळी बोलले. दोन वर्षापूर्वी अडीच कोटी रुपये खर्चून आम्ही जांबोरी मैदान चांगले केले. यामुळे प्रत्येक गोष्टी राजकारण आणू नये, अशी माझी सर्वांना विनंती आहे. हा बालिशपणा आहे, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी नाव न घेता भाजपवर केली. वरळीतील जांबोरी मैदानावर भाजपने दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले आहे. हे मैदान यंदा शिवसेनेला मिळाले नाही. ही शिवसेनेवर मात असल्याचा दावा भाजपकडून करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे बोलले. वरळीमध्ये शिवसेनेचे तीन आमदार आणि एक खासदार आहे. तरीही शिवसेनेला जांबोरी मैदान मिळवता आले नाही.

Leave a Comment