अखेर दहीहंडीला खेळाचा दर्जा मिळाला आहे.कोरोनामुळे दोन वर्षानंतर दहीहंडी कोणत्याही निर्बंधांशिवाय पार पडणार आहे. दरम्यान, महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दहीहंडीत सहभागी होणाऱ्या गोविंदांना सरकारी नोकरीत आरक्षणाचा मोठा निर्णय जाहीर केला. सरकारी नोकरीमध्ये गोविंदाना 5 टक्के आरक्षणाचा लाभ मिळणार असल्याचे मुख्यमंत्र्यांना या निर्णयाची घोषणा करताना जाहीर केले.
दहिहंडीमध्ये सहभागी होणाऱ्या गोविंदांना खेळाडूंचा दर्जा दिला जाणार आहे. इतकचं नाही तर खेळाडूंना सरकारने अनेक सवलती देण्याची देखील घोषणा केली आहे.दहीहंडी खेळणाऱ्या गोविंदाना सरकारी नोकरीत प्राधान्य दिले जाणार आहे. सरकारी नोकरीमध्ये गोविंदाना 5 टक्के आरक्षणाचा लाभ मिळणार आहे. क्रिडा अर्थात स्पोर्ट्स कोट्यातून गोविंदाना खेळाडूंना दिले जाणारे आरक्षण दिले जाणार आहे. याशिवाय 18 वर्षांवरील कॉलेजमध्ये जाणाऱ्या गोविंदांना ग्रेस मार्कही दिले जाणार आहेत.