Palghar Nargrik

Breaking news

अखेर पालघर पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या……

पालघर:- जिल्ह्यातील गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्यासाठी पालघर जिल्हा पोलीस दलातर्फे काल,सकाळी १० ते रात्री १० वाजेदरम्यान ऑपरेशन ऑलआऊट अभियान राबविण्यात आले. हे अभियान एकूण ३ महत्त्वाच्या टप्प्यामध्ये पार पाडण्यात आले. जिल्हा पोलीस अधीक्षकांसह ६२ पोलीस अधिकारी व ३२३ पोलीस अंमलदारांनी रात्रभर हे अभियान राबवून  २६१ वाहनधारकांवर कारवाई तसेच पाहिजे असलेले ६ आरोपींना अटक, दारूबंदी कायद्याप्रमाणे २१ गुन्हे दाखल, अमली पदार्थ विरोधी कायद्याप्रमाणे २ गुन्हे दाखल,व १२७ निगराणी बदमाशांची एकाच वेळी तपासणी करण्यात आली.


जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली अपर पोलीस अधीक्षक प्रकाश गायकवाड, सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी व पोलीस ठाणे प्रभारी अधिकार्यांकच्या सक्रीय सहभागातुन ऑपरेशन ऑल आऊट राबविण्यात आले. सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी व पोलीस अमंलदार हे वरीष्ठ अधिकांर्यातच्या नेतृत्वाखाली सर्वसमावेशक व आक्रमक कारवाई करुन गुन्हेगांरावर विविध कायद्यांतर्गत परिणामकारक कारवाई करतील, हा या अभियानाचा मुख्य उद्देश होता. त्यानुसार पोलीस अधीक्षक पाटील यांनी हे अभियान राबविण्याचे निश्चिखत केले व सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना सविस्तर सुचना दिल्या. ठरल्याप्रामणे २३ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता हे अभियान सुरु होऊन रात्री १० वाजता संपले.


हे अभियान एकुण महत्वाच्या ३ टप्प्यांमध्ये पार पाडण्यात आले. यात नाकाबंदी, अॅ क्शन टिम/हंटर टिम- कारवाई पथक व कोम्बिंग ऑपरेशनचा समावेश गुन्हेगार लपण्याच्या वस्त्यांमध्ये मोठ्या संख्येने मनुष्यबळाने जाऊन संपूर्ण क्षेत्र पिंजून काढला व गुन्हेगाराचा शोध घेतला. पालघर जिल्हा पोलीस दलाने १६ पोलीस ठाणे हद्दीमध्ये २९ महत्वाच्या ठिकाणी एकाच वेळी नाकाबंदी लावली होती. तसेच पहाटेच्या वेळी गुन्हेगारांच्या आश्रयस्थान असलेल्या एकुण २१ वस्त्यांमध्ये एकाचवेळी कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आले.

Leave a Comment