Palghar Nargrik

Breaking news

पालघर मध्ये कामाने! पोलिस खचतात ताणाने!……….

पालघर:- पालघर मध्ये पोलिसांचा कामाचा ताण, वेगेवगळ्या कारणांमुळे लागणारे बंदोबस्त, जेवणाच्या वेळांना लागणारी कात्री यामुळे पोलिसांच्या प्रकृतीवर दुष्परिणाम होत आहेत. हे परिणाम केवळ शारीरिक स्वरूपाचे नसून सतत तणावग्रस्त अवस्थेत राहिल्यामुळे मानसिक अनारोग्याच्या तक्रारीही वाढत आहे. या तक्रारींकडे वेळीच लक्ष दिले नाही तर त्यातून आरोग्य अधिक बिघडत जाईल. मा. एस पी साहेब पालघर जिल्ह्यामध्ये दिवसांना दिवस क्राईम वाढत जाते तसेच लोक वस्ती सुद्धा वाढत जात आहे. उदा. रेल्वे स्टेशन बाहेर ट्राफिक खूप प्रमाणात होते तसेच पाच बत्ती नाका खानपाडा नाका या ठिकाणी वर्दळ खूप असल्यामुळे ट्राफिक खूप मोठ्या प्रमाणात होते. पालघर जिल्ह्याचा पोलीस मनुष्यबळ कमी असल्यामुळे होत आहे जर पोलीस मनुष्यबळ वाढल्यास नक्कीच या समस्यांना तोडगा निघू शकतो चार रस्ता या ठिकाणी पोलीस असले तरी ट्राफिक खूप होते कारण एक ते दोन पोलीस काय करू शकतात पण ते त्यांचा सुद्धा एकदम प्रामाणिकपणे काम पार पाडत असतात. पोलीस स्टेशनला सुद्धा या प्रकारचा खूपभार पडत आहे.

पालघर जिल्हा असल्यामुळे या ठिकाणी सार्वजनिक सण, समारंभ, मोर्चे, नेत्यांचे दौरे, शहरातील सुव्यवस्था राखण्याचा ताण पोलिसांवर येतो.आठ तास ड्युटीच्या वेळा ठरवून दिलेल्या असल्या तरीही आजही या ठिकाणी पोलिसांना १२ तास ऑन ड्युटी राहावे लागते. या ठिकाणी क्राइम जास्त होत असल्यामुळे गुन्हेगारी प्रवृत्ती डोके वर काढत आहे.कधी या ठिकाणी मोर्चा असला तर बाहेरून पोलीस बळ मागवावा लागतो.तर पालघर मध्ये मनुष्यबळ जर वाढल्यास याचा दुसऱ्या पोलिसांवर या गोष्टीचा ताण येणार नाही.

तस पाहिलं तर पाचबत्ती या ठिकाणी सातत्याने वाहतूक कमी करण्यासाठी निलेश हे आपल्या जीवाची आहुती लावून प्रामाणिकपणे काम करत असतात याचा आम्हाला अभिमान आहे.तसेच खानपाडा याठिकाणी सुद्धा संखे म्हणून नवीन आलेले पोलीस हे सुद्धा उत्तमपणे काम करत आहेत. त्याचप्रमाणे चाररस्त्ता ठिकाणी राठोड आहेत.मागील वर्षापासून यांना पाहत आलो आहोत हे दिवस असो या रात्र हे आपलं काम करत असतात.अशा या लोकांना पालघर नागरिकचा सलाम आहे.वेळीअवेळी जेवण ,पुरेशी झोप नसल्यामुळे पोलिसांमध्ये लठ्ठपणा वाढत आहे. या लठ्ठपणामुळे उच्च रक्तदाब, मधुमेह या तक्रारींमध्येही वाढ झाली आहे. सतत उन्हात उभे राहिल्यामुळे डोकेदुखी बळावते. वेगवेगळ्या प्रकारची दुखणी मागे लागतात. अनेकदा ही दुखणी अनाठायी काळजीमुळे निर्माण झालेली असतात. बंदोबस्ताच्या काळात पोलिसांचा दिवसेंदिवस कुटुंबासोबत भेट होत नाही, या तुटलेपणाचा ताण अधिक येतो, पोलिसांकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन आजही सकारात्मक नाही. त्यामुळे समाजात आणि अंतर्गत व्यवस्थेमध्ये मिळणारी वागणूक पोलिसांना नैराश्यग्रस्त करते. त्यामुळे स्वतःला इजा करू घेण्याची शक्यता पोलिसांमध्ये बळावू शकते, तुम्हाला एक कळकळीची विनंती करतो की, पालघर या ठिकाणी मनुष्यबळ वाढवण्यात यावा.व आपल्या पोलिसांचा ताण कमी करण्यात यावा.

यावर केव्हा विचार करणार ?

प्रकृतीचे आजार बळावले की त्यातून पोलिसांमध्ये नैराश्य येते. त्यातून काही जण व्यसनांना जवळ करतात. सिगारेट दारू, तंबाखूसारख्या व्यसनामुळे आरोग्याचे अधिक बिकट प्रश्न निर्माण होतात.

Leave a Comment