Palghar Nargrik

Breaking news

मुंबईतील अनधिकृत टॉवर्सविरोधात किरीट सोमय्या आक्रमक……

नोएडात ट्विन टॉवर पाडल्यानंतर मुंबईतही कारवाई? सोमय्यांची शिंदे सरकारकडे मागणी, प्रताप सरनाईकांचा उल्लेख होताच म्हणाले “हे खरं आहे की…”
नोएडामधील अनधिकृत टॉवर्सवर कारवाई करण्यात आल्यानंतर भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी मुंबईतील अनधिकृत टॉवर्सचा मुद्दा उपस्थित केला आहे. किरीट सोमय्या यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून या अनधिकृत इमारतींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी बिल्डर आणि महापालिकेचे भ्रष्ट अधिकारी यांचं विशेष ऑडिट करण्याची मागणी केली आहे.

ते म्हणाले “मुंबईत भोगवटा प्रमाणपत्र (OC) न मिळालेले शेकडो टॉवर्स आहेत. या ठिकाणी पाच ते १० वर्षांपासून मध्यमवर्गीय राहत आहेत. बिल्डरने या ठिकाणी अनधिकृतपणे अतिरिक्त मजले बांधले आहेत. माझ्या माहितीप्रमाणे, २५ हजाराहून फ्लॅटधारक ओसी न मिळाल्याने चिंतेत आहेत. त्या बिल्डर आणि महापालिकेचे भ्रष्टाचारी अधिकारी यांचं विशेष ऑडिट करावं अशी मागणी आहे”.

Leave a Comment