Palghar Nargrik

Breaking news

अवैधधंद्या बाबत एका महिलेचा गृहमंत्रींना गाराना…..

तक्रार देऊन सुद्धा धंदे सुरू…….
अवैध धंद्यांचा कर्दन काळ ठरणारा पत्रकार त्याच्या बातमीमुळे पोलिसांच्या खोट्या बनावट कारवाईत फसवला जात असेल तर यासारखे वेदनादायक प्रसंग दुसरा कुठलाही असू शकत नाही. कुठलाही पत्रकार आपल्या अवतीभवती घडणाऱ्या चांगल्या वाईट प्रसंगाचा वार्तांकन करत असतो यात त्याच्या विरोधात बातमी असेल तो दुखी आणि त्या व्यक्तीमुळे त्रस्त झालेल्या लोकांना दिलासा मिळण्यामुळे ते समाधान व्यक्त करीत असतील तर त्यात गैर काय?
पण काही पोलीस अधिकारी खाकी परिधान करून सदरक्षणाय खलनिग्रहणाय ही शपथ घेऊन देखील वाम मार्गाला जाणाऱ्या व अनिष्ट समाज विघातक कार्य करणाऱ्या लोकांच्या शुग्रीला काही पैशांसाठी बांधल्या जातात ह्याच्यासारखं वाईट या जगात काहीच असू शकत नाही.


त्यांच्या कर्तव्य प्रधान पोलिसांमुळेच समाजाभिमुख पत्रकारितेला बळ मिळते. अशा पोलीस अधिकाऱ्यांचा पत्रकारितेला सार्थ अभिमानही आहे.त्यांची माफी मागून खाकीच्या आता दडलेल्या आणि पोलिसांच्या ब्रीद वाक्याला अवैध बाजारात मांडणाऱ्या त्या प्रवृत्तीना ठेचने हा पत्रकारितेचा धर्म आहे.

खरे तर हा या खाकीचा लिलाव करणाऱ्या पोलीस निरीक्षणाने काम चालू केल आहे.

मात्र अशा या भ्रष्टाचारी गुन्हेगारांना पाठीशी घालणाऱ्या चालकांना प्रोत्साहन देणाऱ्या पोलीस निरीक्षका विरोधात आम्ही महाराष्ट्र राज्याचे आय.जी.पोलीस कोकण भवन,पोलीस अधिक्षक पालघर,यांच्याकडे तक्रार करून या संदर्भात संबंधित व्यक्तीची चौकशी करण्यासंबंधी तक्रार करण्यात आली आहे.
सध्या चर्चेत असणारा जव्हार येथील अवैध धंदेबाबत न्यूज लागत आहेत. त्या ठिकाणी एका कुटुंबीयांना अवैध्य चालवणारे माणसांकडून खूप त्रास सहन करावा लागत आहे. तसेच त्यांना शिवीगाळ करून मारण्याची धमकी देण्यात येत आहे. तरी सदर बाब लक्षात घेता त्यामध्ये पि आय अप्पासाहेब लेंगरे यांच्या हातात असल्यामुळे या ठिकाणी कोणत्याही धंद्यावर आळा बसत नाही. तर जे तक्रार करतात त्यांच्यावर ३५४ याप्रमाणे गुन्हे दाखल करण्यात येते. आप्पासाहेब लेंगरे यांच्यावर अवैध धंदेवाल्यांचा पाठिंबा आहे. तर अवैध धंद्या वाल्यांना लेंगरे यांचा पाठिंबा आहे हे दिसत आहे. त्यामुळे या ठिकाणी कोणत्याही प्रकारची कारवाई किंवा कोणावरही गुन्हा दाखल होत नाही. जव्हार वासियांना अवैद्य धंद्यांपासून जीवाला धोका निर्माण झाला आहे.

या धंदेवाले व परवानगी देणारे यांनच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा.

गर्दा चालवणारा सुप्रसिद्ध व्यक्ती…..याची पत्नी एका कुटुंबीयांना शिवीगाळ व मारण्यासाठी गेले असता. हे प्रकरण सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये कैद झाले आहे. यांना लेंगरे यांनी पाठवले असेल कुटुंबीयांचा म्हणणं आहे. या प्रकरणात लेंगरे साहेब असल्यामुळे त्यांच्या मुंडावर आतंक गाजवत आहेत. या आतंक गाजवणाऱ्या वर गुन्हा दाखल का होत नाही? जव्हार आदिवासी वस्तीचा भाग आहे. या ठिकाणी लेंगरे हे या भागाला नक्षलवादी भाग बनवण्याच्या बेतावर आहेत. यांचा मास्टर माईंड म्हणजेच लीडर हे लेंगरे आहेत. पोलीस प्रशासन बदनाम करण्याचं काम या साहेबांचा चालू आहे असे जव्हार वासियांमध्ये चर्चा होताना दिसत आहे.

लेंगरे यांच्यावर कायदेशीर कारवाई एसपी साहेब करतील का? पीडित जे तक्रारदार आहेत त्यांच्या घरातील कुटुंबीयांना धोका निर्माण झाला आहे. पीडित महिला हे मा. मुख्यमंत्री,आय जी,एसपी साहेब यांना गाराना घालत आहे. आपण या व्हिडिओमध्ये बघू शकता ते लोक किती घाबरलेल्या आहे. त्यांची काय परिस्थिती आहे? आणि एक दोन नाही कमीत कमी अनेक महिला आहे जे असे गाराना घालत आहे. मुख्यमंत्री साहेब आपण यांच्यावर लक्ष घालतील का? म्हणजे हा किती मोठी बाब आहे. आणि तसेच त्यांच्या कुटुंबीयांना दोन नंबरचे धंदे करणारे त्यांच्याकडून धमकी भेटत आहे. तसेच पोलिसांकडून सुद्धा यांना धमकीचे फोन यायची सुरुवात झालेली आहे. तर तुमच्यावर गुन्हा दाखल होईल तुमची तक्रार आलेली आहे. कारण तुम्ही व्हिडिओ क्लिप सीसीटीव्हीची तुम्ही प्रसिद्ध केलेली आहे. त्यांचेही आम्ही पुरावे तुम्हाला लवकरात देऊ

 

????आपण या व्हिडिओमध्ये ह्या
मुलगा ना बघू शकते…. गर्द नसा

➖पीडित महिला..

Leave a Comment