Palghar Nargrik

Breaking news

तलासरी पोलीस ठाणे यांचे कडून अंमली पदार्थाची विक्री करणाऱ्या आरोपीतांवर धडक कारवाई….

पालघर स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी अधिकारी श्री. अजय वसावे यांना कोफेक्स प्रिक्रीप्शनविना औषध गुंगीकारक द्रव्य अंमली पदार्थाची अनधिकृतपणे बेकायदेशिररित्या विक्रीसाठी वाहतूक होणार असल्याची गुप्त बातमी मिळाली होती. त्यानुसार मुंबई अहमदाबाद महामार्गावरील आरटीओ चेकपोस्ट दापचरी येथे नाकाबंदी सुरू करून संशयित वाहनांची तपासणी सुरू करण्यात आली. नाकाबंदी दरम्यान आरोपीच्या ताब्यातुन मारुती सुझुकी कंपनीची सिल्व्हर एर्टिगा कार क्र. एम. एच. ४८/बी.एच./९६६८ या मध्ये १,४१,७५०/-रु किमतीचे कोफेक्स प्रिक्रीप्शनविना औषध गुंगीकारक द्रव्य अंमली पदार्थाच्या एकूण १०५० प्लास्टिक बाटल्या त्यावर इंग्रजीत meditex life sciences Pvt Ltd Cofex cough syrup Chlor oheni ramien maieat phosphate syrup 100 ml असे लिहलेले वर्णानाचे त्याची प्रत्येकी किंमत १३५ रुपये अशा वर्णनाचा मुद्देमाल मिळून आला.

सदरचे आरोपीत यांचे विरुद्ध तलासरी पोलीस ठाणे गुन्हा रजि.क्र. ३१९/२०२२ एन.डी.पि.एस. ॲक्ट कलम ८ (ब),२२ (क) प्रमाणे गुन्हा दाखल केला असून एकूण ०४ आरोपींना अटक करण्यात आले आहे. सदर घेण्याचा अधिक तपास हा सपोनी/ अमोल गवळी, नेमणूक तलासरी पोलीस ठाणे हे करीत आहेत.


सदरची कामगीरी श्री. बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक पालघर यांचे आदेशान्वये श्री प्रशांत परदेशी, उपविभागीय पोलीस अधिकारी जव्हार विभाग, अतिरिक्त कार्यभार डहाणू विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली श्री अजय वसावे, प्रभारी अधिकारी तलासरी पोलीस ठाणे, सापोनी/ अमोल गवळी, सापोनी/भरत पाटील, पोउपनि/ अनंत धांगडा व तलासरी पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार यांनी यशस्वीरित्या पार पाडली.

Leave a Comment