Palghar Nargrik

Breaking news

“दिवा लागला दारोदारी तरीही आम्ही नाही आमच्या घरी, पालघरच्या डॅशिंग एसपीने माडली आपल्या मनोगातून गणेश उत्सव निमित्त गाथा….”

पालघर मध्ये नवीन आलेले पोलीस अधीक्षक यांनी आल्या पासून खूप उत्तम कामगिरी बजावली आहे. गुन्हेगारीला आळा बसवण्यात आली.एसपी साहेबांनी दिलेले उद्देश खूप मोलाचे आहेत.याकडे जनतेने लक्ष्य दिले पाहिजे.आपल्या जिल्ह्याला हवे असणारे एसपी या पालघर जिल्ह्याला लाभले आहेत.

पालघर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या संकल्पनेतून दि.३१/०८/२०२२ पासून पालघर जिल्हा पोलीस दलातील सर्व पोलीस ठाणेत ” जनसंवाद अभियान” सुरू करण्यात आले आहे. सदर अभियानाअंतर्गत पोलीस ठाणेत नेमणूकीत असलेल्या प्रत्येक पोलीस अंमलदार प्रत्येकी एका गावचा जलसंपर्क अमलदार म्हणून कार्यरत राहील व तो गावातील सरपंच, पोलीस पाटील, शांतता मोहल्ला कमिटी सदस्य, महिला दक्षता सदस्य, तंटामुक्त समिती अध्यक्ष, प्रतिष्ठित नागरिक यांच्या संपर्कात राहून गावातील प्रत्येक सण उत्सव, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गावातील दैनंदिन घटना गावातील नागरिकांचे प्रश्न व अडीअडचणी जाणून घेऊन त्याबाबतच्या माहितीची देवाण-घेवाण करतील त्याचबरोबर त्याच सोबत नेमण्यात आलेल्या अंमलदार प्रत्येक गावचा एक व्हाट्सअप ग्रुप कार्यान्वित करेल. सदर ग्रुप मध्ये गावातील सर्व संभाव्य घटनांबाबत तसेच इतर माहितीचे संदेश प्रसारित करण्यात येतील गावची प्रत्येक आठवड्याकरिता एक सभा आयोजित करून गावातील जनतेचे प्रश्न अडीअडचणी सोडवण्यात येतील त्यामुळे पोलीस व जनता यामध्ये समन्वय सुसंवाद प्रस्थापित करता येईल.

त्या अनुषंगाने सफाळे पोलीस ठाण्याच्या वतीने गणेश उत्सव सणाच्या अनुषंगाने दि.०३/०९/२०२२ रोजी सफाळे पोलीस ठाणे या ठिकाणी सत्यनारायण पूजा व स्नेह भोजनाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमांमध्ये उपस्थित पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी उपस्थित सर्व नागरिकांना मार्गदर्शन केले. नमूद कार्यक्रमास श्री.बाळासाहेब पाटील पोलीस अधीक्षक पालघर, यांचेसह अप्पर पोलीस अधीक्षक प्रकाश गायकवाड, श्रीमती नीता पाडवी उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच इतर पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार, गावचे सरपंच पोलीस पाटील शांतता मोहल्ला कमिटी सदस्य, महिला दक्षता सदस्य, तंटामुक्त समिती अध्यक्ष, प्रतिष्ठित नागरिक हे या ठिकाणी उपस्थित होते.

आपला पोलीस मित्र ????????????

Leave a Comment