स्वच्छ भारत अभियान टप्पा दोन अंतर्गत स्वच्छता ही सेवा मोहिमेद्वारें आज दिनांक१७/९/२०२२ रोजी जिल्हा परिषद पालघर तसेच पंचायत समिती पालघर आणि ग्रामपंचायत केळवे यांच्या संयुक्त विद्यमाने केळवे समुद्रकिनाऱ्याची स्वच्छता करण्यात आली. मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पालघर सिद्धाराम सालीमठ यांच्या प्रमुख उपस्थितीत ही मोहीम राबवण्यात आली. सोनोपंत दांडेकर महाविद्यालय पालघर आणि आदर्श विद्या मंदिर केळवे येथील प्राचार्य, शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या विशेष सहभागा मध्ये ही मोहीम राबविण्यात आली.
तहसीलदार पालघर, उप.मु.का.अ.(सा.) संघरत्ना खिल्लारे, उप.मु.का.अ.(पंचायत) चंद्रशेखर जगताप, जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रवीण भावसार, कार्यक्रम अभियंता (पा.पु) गंगाधर निवडुंगे, पशुधन विकास अधिकारी,कृषी विकास अधिकारी सूरज जगताप, डॉ.पंजाबराव चव्हाण, गट विकास अधिकारी पालघर, केळवे ग्रामस्थ, केळवे ग्रामपंचायत चे प्रशासक,कर्मचारी, तसेच अधिकारी यांनी देखील या मोहिमेत उस्फुर्त सहभाग घेतला. यावेळी सम्पूर्ण किनाऱ्याची स्वछता करून कचरा गोळा करून घंटा गाडीत भरून पाठवण्यात आला.
सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत स्वच्छतेची शपथ देखील यावेळी घेण्यात आली.