पत्राचाळ घोटाळा (PatraChawl Scam) प्रकरणी शिवसेना (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) सध्या न्यायालयीन कोठडीत (judicial Custody) आहेत. 31 जुलैला संजय राऊत यांना ईडीने (ED) ताब्यात घेतलं. त्यानंतर ते 8 ऑगस्टपर्यंत इडी कोठडीत होते. 8 ऑगस्टला त्यांना न्यायालयात हजर केलं असता 14 दिवसांची म्हणजे 22 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. त्यानंतर त्यांच्या न्यायालयीन कोठडीत पुन्हा वाढ करण्यात आली होती.
संजय राऊत यांची न्यायालयीन कोठडी आज संपणार होती, पण आजच्या सुनावणीत कोर्टाने त्यांच्या कोठडीत पुन्हा 14 दिवसांची वाढ केली आहे. त्यामुळे संजय राऊत गेल्या दीड महिन्यांपासून कोठडीतच आहेत. सुरुवातीपासूनच संजय राऊत यांना जामीन मिळू नये, अशी ईडीचा भूमिका होती.
संजय राऊत यांच्यावर आरोप
मुंबईतल्या गोरेगाव इथल्या पत्राचाळ घोटाळाप्रकरणी संजय राऊत यांचा संबंध असल्याचा आरोप ईडीने (ED) केला आहे. संजय राऊत यांचे भाऊ प्रविण राऊत यांना HDIL ग्रुपकडून 112 कोटी रुपये मिळाल्याचा आरोप असून त्यापैकी 1 कोटी 6 लाख रुपये संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्या खात्यात ट्रान्सफर करण्यात आले होते, त्याच पैशातून अलिबाग इथं जमीन खरेदी करण्यात आल्याचा आरोप संजय राऊत यांच्यावर आहे.
ईडीने का मागितली होती कोठडी?
संजय राऊत यांना ईडीने 1 ऑगस्ट रोजी मध्यरात्री अटक केली होती. प्रथम न्यायालयाने संजय राऊत यांना ४ ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावली होती. त्यानंतर पुन्हा न्यायालयाने त्यांना 8 ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावली. प्रवीण राऊत (Pravin Raut) यांनी पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्प घेतला मात्र त्यांनी तो प्रकल्प खासगी बिल्डरला विकला. हा एक हजार रुपयांहून अधिकचा घोटाळा आहे.
या घोटाळ्यातून प्रवीण राऊत यांना 112 कोटी रुपये मिळाले. प्रवीण राऊत यांनी या रकमेपैकी एक कोटी 6 लाख राऊत कुटुंबीयांना दिले. नंतर ईडीला संजय राऊत याांच्या चौकशीतून अधिक माहिती मिळाली. प्रवीण राऊत आणि संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्यात आणखी एक व्यवहार झाला होता. प्रवीण राऊत यांनी वर्षा राऊत याांच्या बँक खात्यात 1 कोटी 8 लाख रुपये भरले होते.
याशिवाय संजय राऊत यांनी अलिबाग इथं विकत घेतलेल्या जमीन मालकाला एक कोटी 17 लाख रोख रक्कम दिली होती. ईडीला या व्यवहाराबाबत अधिक चौकशीची गरज होती, म्हणूनच त्यांनी गेल्या वेळी संजय राऊत यांची कस्टडी मागितली होती.