पनवेल महामार्ग सुरक्षा पथकाचे रामचंद्र नारायण वारे पोलीस निरीक्षकाला १ लाख रुपयांची लाच घेताना अटक करण्यात आली आहे. तक्रारदार आणि त्यांच्या सहकाऱ्याची बदली करण्यासाठी दोघांचे मिळून 1 लाख रुपये लाच घेताना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहाथ पकडले आहे. ठाणे एसीबीच्या पथकान ही कारवाई मंगळवारी (दि.२०) सायंकाळी ६.३६ वाजता पोलीस निरीक्षक वारे यांच्या केबिनमध्ये केली.तक्रारदार आणि त्यांच्या सहकाऱ्याची बदली करण्यासाठी पोलीस निरीक्षक रामंचंद्र वारे यांनी प्रत्येकी ५० हजार प्रमाणे १ लाख रुपये लाच मागितली. तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी ठाणे एसीबीकडे तक्रार केली.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक ठाणे विभागाचे पोलीस अधीक्षक पंजाबराव उगले,अपर पोलीस अधीक्षक अनिल घेरडीकर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पालघर पोलिस उपअधीक्षक नवनाथ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक स्वपन बिश्वास
पोलीस हवालदार संजय सुतार, अमित चव्हाण, विलास भोये, निशा मांजरेकर, नवनाथ भगत,
पोलीस नाईक दिपक सुमडा, सखाराम दोडे यांच्या पथकाने केली.