पालघर:-जव्हार परिसरात बेकायदा गुटखा,चरस,गांजा राजरोसपणे सुरू आहेत पोलिस त्याकडे कानाडोळा करीत असल्याने विक्रमगड विधानसभेचे आमदार सुनील भुसारा यांनी संतप्त भावना निर्माण केले आहेत. पोलिसांच्या नाकावर टिच्चून उघडपणे अवैध धंदे करीत असताना पोलीस प्रशासन त्यात सामील असल्याने सगळे कसे आलबेल चालू आहे.
गावातील तरुण व्यसनाधीन बनल्याने काहींचे संसार उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत. दिवसाबरोबरच रात्रीही टोळक्याने बसून गांजा ओढण्याचा, तसेच चरस,चोरी केली जात आहे. याला आवर घालण्यास पोलिस असमर्थ ठरले आहेत. गुन्हेगारीत अल्पवयीन मुले सामील झाल्याचे दिसून येत आहे.
रात्री-अपरात्री चरस,गांजा पिउन धाब्यावर हाणामार्या, गोंधळ, हा नित्याचाच प्रकार झाला आहे. त्यामुळे गावची शांतता सुरक्षितता धोक्यात येऊ लागली आहे. पोलिसांनी वेळीच लक्ष घालून अवैध धंद्यांना आळा घालावास अशी मागणी आमदार सुनील भुसारा यांनी केली आहे.
जव्हार मोठ्या लोकसंख्यचे व शेजारील पाच सहा गावांचे दैनंदिन बाजारपेठेचे मध्यवर्ती गाव आहे. पोलिस कारवाई करतात, पण नाट्यमय घडामोडीनंतर परत परिस्थिती’ जैसे थे’ होते. अवैध धंदे करणार्यांवर कडक कारवाईची मागणी होत आहे. पोलिसांनी वेळीच कारवाई करावी, अशा मागणीने आता चांगलाच जोर धरला आहे.
दरम्यान, परिसरातील गावांमध्येही अवैध धंदे जोरात सुरू असून, तेथील ग्रामस्थ त्याला वैतागले आहेत. पोलिसांच्या आशीर्वादामुळे हे व्यावसायिक कोणालाच जुमानत नाहीत. या गावांमधील अवैध धंदे बंद करण्याची मागणी आमदार सुनील भुसारा यांनी केली जात आहे.